ज्याला मॅसेज येणार, त्यालाच कोरोनाची लस मिळणार – राजेश टोपे

ज्याला मॅसेज येणार, त्यालाच कोरोनाची लस मिळणार – राजेश टोपे

देशात कोरोनाने थैमान घातल्यानंतर आता त्यावर लस उपलब्ध झाली आहे. लवकरच केंद्राच्या मंजूरीनंतर लसीकरणाला सुरुवात होईल. दरम्यान, राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी कोरोना लसीबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे. केंद्र सरकार कोरोनाच्या लसीबाबत मायक्रो प्लॅनिंग करत आहे. लस देण्यासाठी कार्यपद्धती आखण्यात आली असून ज्या तारखेला लस द्यायची आहे, त्या व्यक्तीला त्या संदर्भात मॅसेज केला जाईल. त्यानंतर त्या व्यक्तीने लसीकरणाच्या ठिकाणी जायचे आहे. तिथे त्या वक्तीची ओळख पटवली जाईल, त्यानंतर त्या व्यक्तीला कोरोनाची लस देण्यात येईल, अशी माहिती राजेश टोपे यांनी दिली आहे.

आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी पत्रकारांशी संवाद साधताना कोरोना लसीबाबत महत्त्वाची माहिती दिली. लस देण्यासंदर्भात केंद्र सरकार माहिती मागवत आहे. त्यासाठी आता हेल्थ वर्कर्सचा डेटा, अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी, ५० वर्षांवरील नागरिक तसेच इतर आजार असलेले ५० वर्षाखालील नागरिक असा सर्व डेटा तयार केला जात आहे, अशी माहिती राजेश टोपे यांनी दिली. पुढे बोलताना त्यांनी सांगितले की, १८ हजार लोकांना ट्रेनिंग द्यायचे काम आता पूर्ण होणार आहे.

लस स्टोरेजसाठी कोल्डचेनची व्यवस्था झाली आहे. लस देण्यासाठी कार्यपद्धती आखण्यात आली असून ज्या तारखेलालस द्यायची आहे, त्या व्यक्तीला त्या संदर्भात मॅसेज केला जाईल. त्यानंतर त्या व्यक्तीची ओळख पटवून त्याला लस दिली जाणार आहे. त्तर प्रदेशात मेडिकल स्टाफच्या सुट्ट्या रद्द केल्या आहेत. मात्र, आपल्या इथे असे काही करण्याची आवश्यकता नाही. आपल्याकडे पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध आहे. गरज पडली तर सुट्टया रद्द करता येतील, असेही टोपे यांनी सांगितले.

 

First Published on: December 17, 2020 4:25 PM
Exit mobile version