महाराष्ट्रातील सत्तासंघर्ष : सुप्रीम कोर्टातील सुनावणी उद्याऐवजी परवा होण्याची शक्यता

महाराष्ट्रातील सत्तासंघर्ष : सुप्रीम कोर्टातील सुनावणी उद्याऐवजी परवा होण्याची शक्यता

महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाची सर्वोच्च न्यायालयात होणारी सुनावणी पुन्हा लांबणीवर जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सोमवारी 22 ऑगस्ट रोजी होणारी सुनावणी परवा म्हणजेच 23 ऑगस्ट रोजी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दुपारी सुनावणी होणाऱ्या यादीत समाविष्ट असणारी सुनावणी बदलण्यात आली आहे. तांत्रिक अडचणीमुळे सुनावणी पुढे जाण्याची शक्यता आहे.

महाराष्ट्रातील सत्ता संघर्ष आता सर्वोच्च न्यायालयात पोहोचला आहे. एकनाथ शिंदेगटाला कमकुवत करण्यासाठी शिवसेनेकडून 16 आमदारांचे विधानसभा सदस्यत्व रद्द करण्याची मागणी विधानसभा उपाध्यक्षांकडे करण्यात आलीय. त्याबाबत 16 पिटिशनही सादर करण्यात आलेत. 16 आमदारांच्या निलंबन नोटिसीविरोधात एकनाथ शिंदे गटाने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली.

एकनाथ शिंदे यांचे बंड, आमदारांच्या अपात्रतेचा मुद्दा त्यानंतर राज्यात सत्तेवर आलेले सरकार याबाबत सुप्रीम कोर्टात सुरु असलेली सुनावणी लांबणीवर पडण्याची शक्यता आहे. उद्या दिनांक २२ ऑगस्ट रोजी या प्रकरणाची सुनावणी सर्वोच्च न्यायालयात होणार होती. मात्र आता ती सुनावणी उद्या होईल का, याची शक्यता कमी आहे. तांत्रिक कारणामुळे ही सुनावणी आणखी लांबणीवर पडण्याची शक्यता वर्तवण्यात येते आहे.

हे आहे सुनावणीत अपेक्षित?


हेही वाचा – ओबीसी नेते हरिभाऊ राठोड यांचा ‘आप’मध्ये प्रवेश

First Published on: August 21, 2022 10:06 PM
Exit mobile version