आरे कारशेड: पर्यावरणवाद्यांच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी

आरे कारशेड: पर्यावरणवाद्यांच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी

मेट्रो-३ प्रकल्पाच्या कारशेडविरोधात केलेल्या याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. याआधी न्यायमूर्ती धनजंय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील ही सुनावणी झाली होती, आता न्यायमूर्ती उदय लळीत यांच्या अध्यक्षतेखाली सुनावणी होणार आहे.

२०१९ मध्ये महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर आल्यानंतर आरे कारशेडवरील कामावर स्थगिती लावण्यात आली होती. पर्यावरणवाद्यांचा विरोध आणि जनआंदोलन लक्षात घेता ठाकरे सरकारने हा निर्णय घेतला होता. मात्र, बंडखोरी झाल्यानंतर शिंदे-फडणवीस सरकारने सत्तेवर येताच दुसऱ्याच दिवशी आरे कारशेडवरील स्थगिती उठवण्यात आली. स्थगिती उठवल्यानंतर कारशेडच्या कामाला गती आली आहे. कामासाठी पुन्हा वृक्षतोड करण्यात आली. त्यामुळे पर्यावरणवादी संतापले. त्यांनी या निर्णयाच्या विरोधात पर्यावरणप्रेमींनी आरेत आंदोलनही केले. वृक्षतोडीबाबत परिस्थिती जैसे थे ठेवण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले होते. तरीही वृक्षतोड करण्याचा दावा या पर्यावरणवाद्यांकडून कऱण्यात आला. याप्रकरणी त्यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. या याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे.

त्यामुळे, आरो कारशेडला स्थगिती मिळणार की प्रकल्पाल गती येणार हे पाहावं लागणार आहे.

First Published on: August 5, 2022 8:26 AM
Exit mobile version