राज्यात उष्णतेची लाट: अनेक शहरांत पारा 40 अंशाच्या पुढे; जाणून घ्या कोणत्या शहरात किती तापमान

राज्यात उष्णतेची लाट: अनेक शहरांत पारा 40 अंशाच्या पुढे; जाणून घ्या कोणत्या शहरात किती तापमान

Maharashtra weather Forecast

राज्यात मागच्या काही दिवसांपासून सुरु असणारा अवकाळी पाऊस आता काशी अंशी थांबल्याचं दिसून येत आहे. असं असलं तरी राज्यात काही भागात तापमान खूप वाढलं आहे. सध्या देशातील तापमानात कमालीची वाढ झाली आहे. बहुतांश शहरात तापमानाचा पारा हा 40 ते 44 अंश सेल्सिअसच्या आसपास गेले आहे. उष्णतेचा नागरिकांना त्रास होऊ लागला आहे.( Heat wave in state mercury crosses 40 degrees in many cities Find out what the temperature is in which city )

जाणून घ्या कुठे किती तापमानाची नोंद

उत्तर प्रदेशातील हमीरपूर आणि प्रयागराज इथे 44.2 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. सफदरजंग हवामान केंद्राने दिलेल्या माहितीनुसार, दिल्लीतील कमाला तापमान 40.4 अंश सेल्सिअस नोंदवले आहे. जे सामान्य तापमानापेक्षा चार अंशांनी जास्त आहे. दिल्लीत सलग चौथ्या दिवशी कमाल तापमान हे 40 अंश सेल्सिअसच्या वर नोंदवले गेले. पुसा आणि पीतमपुरा भागात कमाल तापमान अनुक्रमे 41.6 अंश ते 41.9 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचले.

पुढचे काही दिवस उष्णतेचे

पुढील काही दिवसांमध्ये राज्यात उष्णतेची लाट येणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. ज्यामुळे पुणे नजीकच्या भागातील तापमान 40 अंशांवर पोहोचू शकतं. त्यातच चंद्रपुरात तापमानाचा आकडा 43.6 अंशांवर पोहोचल्यामुळे उष्णतेची तीव्रता लक्षात येत आहे. पुढील काही दिवस चंद्रपुरात अशीच परिस्थिती राहणार आहे, असा इशारा हवामान विभागाने दिला आहे. तर, तिथे वाशिमचे तापमानही 42 अंशावर पोहोचले आहे. तर परभणीचा पारा 41 अंशांपर्यंत गेला आहे. तापमानाचे हे आकडे पाहता सध्या राजय्ता सकाळच्या वेळी रस्त्यांवर नागरिकांची गर्दीही कमी दिसू लागली आहे.

( हेही वाचा: विदर्भातील शाळांना ३० जूनपर्यंत उन्हाळ्याची सुट्टी; दीपक केसरकरांची माहिती )

अवकाळीच संकट कायम

राज्यात कडाक्याचा उन्हाळा सुरु झाला असताना काही भाग मात्र यासाठी अपवाद ठरत आहे. त्यातील एक म्हणजे पुणे. पुढचे 2 दिवस पुण्यात पाऊस पडण्याची शक्यता आहे. पुणे वेधशाळेने हा अंदाज वर्तवला आहे. पुणे शहरासह हवामान खात्याने पुणे जिल्ह्यातील यलो अलर्ट जारी केला आहे.

First Published on: April 19, 2023 9:06 AM
Exit mobile version