heat wave precautions : ऊन जरा जास्तच झालंय, मग ‘ही’ काळजी घ्याच!

heat wave precautions : ऊन जरा जास्तच झालंय, मग ‘ही’ काळजी घ्याच!

उन्हाळा असह्य झाला आहे. त्यातच कोकणासह मुंबई ठाण्यात उष्णतेची लाट आहे. मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र आण विदर्भाचा पारा यापूर्वीच वाढला आहेय. त्यामुळे यापासून स्वत:चा आणि कुटुंबाचा कसा बचाव करावा, यासाठी आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन विभागाने महत्त्वाच्या सूचना केल्या आहेत. या सूचनेत काय करावे आणि काय करू नये, हे स्पष्ट केले आहे.

हे आवर्जून करा

  1. तहान लागलेली नसली तरी प्रत्येकाने दर अर्धा तासाने पाणी प्यावे
  2. दुपारी १२ ते ३ दरम्यान घराबाहेर पडू नये
  3. घराबाहेर पडण्याची गरज असेल तर डोक्यावर टोपी वापरावी किंवा छत्रीचा वापर करावा
  4. कडक सूर्यप्रकाशापासून वाचण्यासाठी पडदे आणि झडपांचा वापर करावा
  5. सुती, हलके आणि पातळ कपडे वापरावेत
  6. प्रवास करत असाल तर सोबत पाण्याची बाटली बाळगा
  7. उन्हात काम करत असाल तर डोक्यात टोपी घाला, ओल्या कपड्याने डोके, मान
    आणि चेहरा झाकावा
  8. शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होत असल्यास ओआरएस, लिंबू-पाणी, ताक, घरी बनवलेली लस्सी, कैरीचे पन्हे याचं सेवन करा
  9. अशक्तपणा, डोकेदुखी, सतत घाम येत असेल किंवा चक्कर येत असल्यास तात्काळ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा
  10. गुरांना छावणीत ठेवावे आणि त्यांना पुरेसे पाणी द्यावे
  11. घर थंड ठेवण्यासाठी पडदे, शटर आणि सनशेडचा वापर करावा तसेच रात्री खिडक्या उघड्या ठेवाव्यात
  12. कामाच्या ठिकाणी जवळच थंड पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी
  13. सूर्यप्रकाशाचा थेट संबंध टाळण्यासाठी कामगारांना सूचना द्याव्यात
  14. सकाळी लवकरात लवकर कामे करून घ्या
  15. गर्भवती तसेच आजारी कामगारांची अधिक काळजी घेण्यात यावी

या बाबी टाळा

या सूचनांचं पालन केल्यास आपला उष्णतेच्या लाटेपासून बचाव होईल आणि कुटुंबही सुरक्षित राहील.

First Published on: April 16, 2024 4:14 PM
Exit mobile version