महाराष्ट्रात ‘हीटवेव्ह अलर्ट

महाराष्ट्रात ‘हीटवेव्ह अलर्ट

Weather alert : सावधान! उष्णतेचा कहर वाढणार, महाराष्ट्रात काय स्थिती

आगामी तीन दिवसांसाठी प्रादेशिक हवामान केंद्र मुंबई मार्फत हिटवेव्ह बुलेटिन जारी करण्यात आले आहे. त्यानुसार महाराष्ट्रात विदर्भात हीटवेव्हचा फटका बसणार आहे. येत्या दोन दिवसांमध्ये विदर्भातील काही भागांसाठी हीटवेव्हचा अलर्ट हा नांदेड, हिंगोली, परभणी याठिकाणांसाठी देण्यात आला आहे.

याही ठिकाणी ‘हिटवेव्ह’

आयएमडीमार्फत उत्तर पश्चिम, मध्य भारतातही हिट वेव्हचा अंदाज आगामी पाच दिवसांसाठी जारी केला आहे. त्यासोबतच २५ मे ते २७ मे दरम्यान मोठ्या प्रमाणात पावसाची शत्यताही वर्तवण्यात आली आहे. आयएमडीने पंजाब, हरियाणा, चंदीगड, दिल्ली, राजस्थानसाठी हा अलर्ट जारी केला आहे. दक्षिण भारतातही या कालावधीत मोठ्या प्रमाणात पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. देशात सर्वाधिक तापमानाची नोंद ही ४६.६ डिग्री सेल्सिअस इतकी नोंद चुरू (पश्चिम राजस्थान) येथे झाली आहे. तर मेघालय आणि आसाममध्येही रेड अॅलर्ट जारी करण्यात आला आहे.

२४ तासांतील सर्वात हॉट शहरे

गेल्या २४ तासांत राज्यातील काही शहरे ही हॉट शहरे ठरली आहेत. यामध्ये पाच शहरे ही एकट्या राजस्थानमधील आहेत. तर मध्य प्रदेश आणि महाराष्ट्र मधील दोन शहरात अधिक उष्णता जाणवू लागली आहे. तर यामध्ये युपीच्या एका शहराचा देखील समावेश आहे.

First Published on: May 23, 2020 8:29 PM
Exit mobile version