राज्यात पुढील चार ते पाच दिवस मुसळधार पावसाचा इशारा, ‘या’ जिल्ह्यांना अलर्ट जारी

राज्यात पुढील चार ते पाच दिवस मुसळधार पावसाचा इशारा, ‘या’ जिल्ह्यांना अलर्ट जारी

राज्यात पुढील चार ते पाच दिवस मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे. मुंबई, ठाणे, कोकणासह सध्या पावसाची संततधार सुरू आहे. पुणे आणि सातारा यांसारख्या जिल्ह्यांमध्ये रविवारपर्यंत पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. येत्या १३ सप्टेंबरपर्यंत राज्यात पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता आहे.

रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग यांसारख्या किनारी जिल्ह्यांतील निर्जन भागांमध्ये येत्या शुक्रवार ते रविवार या कालावधीत मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तण्यात आली आहे. नशिक जिल्ह्यात झालेल्या पावसामुळे सखल भागात पाणी साचले होते. तर शहरी भागात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती. तसेच धरणांच्या पाण्याच्या पातळीत सुद्धा वाढ झाली होती.

राज्यातील काही जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह आणि मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे कोकण किनारपट्टी, मध्य महाराष्ट्रातील घाट परिसरात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात येत आहे.


हेही वाचा :तुम्ही काळजी करू नका, मुख्यमंत्री प्रशासन चालवतील; चंद्रकांत पाटलांचे सुळेंना प्रत्युत्तर


 

First Published on: September 11, 2022 10:57 AM
Exit mobile version