कोल्हापूरच्या जोतिबा डोंगरावर मुसळधार पाऊस

कोल्हापूरच्या जोतिबा डोंगरावर मुसळधार पाऊस

कोल्हापूरात मुसळधार पाऊस

कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळा तालुक्यात सलग दुसऱ्या दिवशी पाऊस पडत आहे. जोतिबा डोंगरावर आज दुपारी मुसळधार पाऊस पडला. त्यामुळे जोतिबा डोंगरावर ढगफूटीचे स्वरुप आले होते. या पावसामुळे ज्योतिबा मंदिर परिसरामध्ये पाणी पाणीच झाले होते. मंदिराकडे जाणाऱ्या पायऱ्यावरुन वेगाने पाणी वाहत होते. त्यामुळे मंदिरामध्ये दर्शनासाठी आलेल्या भाविकांची गैरसोय झाली.

जोतिबा डोंगरावर अचानक मुसळधार पाऊस पडण्यास सुरुवात झाली. त्यामुळे मंदिरात आलेल्या भाविकांची तारंबळ झाली. पाऊस आल्याने सर्व भाविक आडोशाला उभे राहिले होते. पावसाचे पाणी ऐवढ्या वेगाने वाहत होते की भाविकांना जोतिबाचा डोंगर उतरणे शक्य नव्हते. अगदी ढगफूटी झाल्यासारखा पाऊस पडला. मंदिराच्या पायऱ्यांवरुन पाणी वेगाने वाहत असल्याने त्याला धबधब्यांचे रुप आले होते. मात्र मंदिरात दर्शनासाठी आलेल्या काही भाविकांनी या पावसाची मजा घेतली. पावसामुळे मंदिरपरिसरामध्ये गारवा निर्माण झाला आहे.

First Published on: November 20, 2018 7:51 PM
Exit mobile version