पावसाने रायगडला धू-धू धुतले!

पावसाने रायगडला धू-धू धुतले!

heavy rain

गेल्या पाच दिवसांपासून जिल्ह्याच्या बहुतांश भागात कोसळणार्‍या पावसाने मंगळवारी रात्रीपासून रौद्र रूप धारण केल्याने सावित्री, अंबा, कुंडलिका नदीला पूर आला असून, जिल्ह्यातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. पावसामुळे रेल्वे, एसटी वाहतुकीवरही परिणाम झाल्याने प्रवास ठप्प झाला. गणेशोत्सवाचा उत्साह असताना पावसाने त्यावर पाणी फेरले आहे. नदी शेजारील गावांतील गणेशोत्सवाला पुराचा फटका बसल्याने भक्तांचा व चाकरमान्यांचा हिरमोड झाला. सुदैवाने पावसामुळे कुठेही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही.

गणेशोत्सावला रंग चढत असताना पावसाने या रंगाचा बेरंग करून टाकला आहे. अनेक ठिकाणी घरांतून पाणी शिरल्याने गणेश भक्तांची तारांबळ उडाली. महाड व नागोठणे येथे पुरामुळे जनजीवन ठप्प झाले असून, नागोठणे येथील पूरग्रस्त नागरिकांना ग्रामपंचायतीकडून भोजनाची व्यवस्था करण्यात आली. या दोन्ही ठिकाणची बाजारपेठ दिवसभर पाण्याखाली होती. मुंबई-गोवा महामार्गाला प्रभावी पर्याय ठरलेल्या खोपोली-पाली-वाकण मार्ग अंबा नदीला आलेल्या पुरामुळे बंद ठेवण्यात आला होता.

First Published on: September 5, 2019 1:26 AM
Exit mobile version