‘क्यार’ नंतर आता ‘महा’ चक्रीवादळ: महाराष्ट्रात अतिवृष्टीचा इशारा

‘क्यार’ नंतर आता ‘महा’ चक्रीवादळ: महाराष्ट्रात अतिवृष्टीचा इशारा

छायाचित्र mahasamvad वरुन साभार

भारतीय हवामान खात्याकडून प्रसिद्ध झालेल्या सुचनेनुसार अरबी समुद्रात निर्माण झालेल्या महा (MAHA) चक्रीवादळामुळे दि. ६ नोव्हेंबर २०१९ ते ८ नोव्हेंबर २०१९ पर्यंत उत्तर कोकणासह उत्तर मध्य महाराष्ट्राला मेघगर्जनेसह अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. तसेच समुद्रामध्ये वाऱ्याचा वेग जास्त राहणार असल्याने मच्छिमारांना देखील सतर्कतेचा इशारा दिलेला आहे. मागच्या आठवड्यातच कोकण किनारपट्टीला क्यार वादळाचा तडाखा बसला होता. त्यामुळे ऐनदिवाळीत मच्छीमारांवर मासेमारीची बंदी टाकण्यात आली होती. त्यानंतर महाराष्ट्राच्या काही भागात अवकाळी पावसाने कहर केला होता. आता पुन्हा महा चक्रीवादळाचा इशारा देण्यात आला आहे.

समुद्रात गेलेल्या मच्छिमारांना पुन्हा समुद्र किनारपट्टीवर येण्याचे देखील या सूचनेत कळविण्यात आले आहे. याबाबत योग्य त्या उपाययोजनेसह तयारीत राहण्याबाबत सर्व विभागीय आयुक्त आणि सर्व जिल्हाधिकारी यांना सूचना देण्यात आल्याचे व कोणत्याही मदतीसाठी मंत्रालय नियंत्रण कक्षाशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आल्याचे मंत्रालय नियंत्रण कक्षाच्यावतीने कळविण्यात आले आहे

महाराष्ट्र सरकारचा इशारा
First Published on: November 3, 2019 10:08 PM
Exit mobile version