राज्याच्या विविध भागात पावसाची जोरदार हजेरी, जनजीवन विस्कळीत

राज्याच्या विविध भागात पावसाची जोरदार हजेरी, जनजीवन विस्कळीत

मुंबई – राज्याच्या विविध भागात पावसाने हजेरी लावली आहे. पावसामुळे अनेक भागात जनजीवन विस्कळीत झाले आहे. मुंबईसह ठाणे परिसरात पावसाने जोरदार हजरे लावली. पुणे, रायगड रत्नागिरी, कोल्हापूर, सोलापूर, नंदूरबार, वर्धा, अहमदनगर, बुलडाणा या भागातही पावसाचा जोर वाढला आहे. आज कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राला पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तर नाशिक आणि पालघर जिल्ह्यातही हवामान विभागाने ऑरेंज अलर्ट दिला आहे.

काही जिल्ह्यांना आरेंज अलर्ट तर काही जिल्ह्यांना यलो अलर्ट –

हवामान विभागाच्या अंदाजानुसार राज्याच्या विविध भागात जोरदार पावसाने हजेरी लावली असून काही ठिकाणी शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. तर काही ठिकाणी मुसळधार पावसामुळे शेत पिकांना फटका बसला आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार राज्याच्या विविध भागात पावसाचा अंदाज वर्तवला जात आहे. आज कोकणातील रायगड आणि रत्नागिरी या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तर सिंधुदुर्ग आणि ठाण्यात आज ‘यलो अलर्ट’ देण्यात आला आहे. तर पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सातारा आणि कोल्हापूरमध्ये पावासाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तसेच नाशिक आणि पालघर या जिल्ह्यांना पावासाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे.

तीन चार दिवस मान्सून राहणार सक्रिय –

हवामान विभागाच्या अंदाजानुसार पुढील 3 ते 4 दिवस आणि त्यापुढील दिवसात मान्सून राज्यात सक्रिय राहणार आहे. तर काही जिल्ह्यात अतिवृष्टी होण्याचा अंदाज आहे. कोकण आणि मध्य महाराष्ट्रावर याचा वाढता परिणाम होऊ शकतो. त्यामुळे नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

देशाच्या विविध भागात विजांच्या कडकडाटासह पाऊस –

उत्तराखंडच्या जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी मेघगर्जनेसह विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. आंध्र प्रदेशातील श्रीकाकुलम जिल्ह्यात मंगळवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे महामार्ग आणि निवासी वसाहती जलमय झाल्या होत्या. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, येत्या 2-3 दिवसांत राजस्थानच्या अनेक भागात मध्यम ते मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. हवामान खात्याच्या प्रवक्त्याने सांगितले की, या प्रणालीच्या प्रभावाखाली, पुढील 4-5 दिवस पूर्व राजस्थानच्या बहुतांश भागात हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे.

13-15 सप्टेंबर दरम्यान, कोटा, जयपूर, उदयपूर आणि भरतपूर विभागातील जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. स्कायमेटनुसार, पुढील 24 तासांत पश्चिम बंगाल, किनारी ओडिशा आणि आंध्र प्रदेशच्या उत्तर किनार्‍यावर मध्यम ते मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. याशिवाय बिहार, झारखंड, ओडिशा, मध्य प्रदेश, गुजरात आणि कोकण आणि गोव्यात हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. उर्वरित ईशान्य भारत, दक्षिण छत्तीसगड, आग्नेय राजस्थान, किनारी कर्नाटक, केरळ, उत्तराखंड आणि तेलंगणाच्या काही भागात हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे.

First Published on: September 14, 2022 8:17 AM
Exit mobile version