सलग सुट्ट्यांमुळे मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर आज मोठी वाहतूक कोंडी

सलग सुट्ट्यांमुळे मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर आज मोठी वाहतूक कोंडी

ऑगस्ट महिन्यात अनेक मराठमोठे सण साजरे केले जाणार आहेत. मात्र, आजपासून सलग तीन-चार दिवस सुट्ट्या असल्यामुळे प्रवाशांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागणार आहे. सलग सुट्टया असल्यामुळे मुंबईकरांनी बाहेर जाण्याचा प्लॅन आखला आहे. मुंबईतून मोठ्या संख्येने पर्यटक शहराबाहेर निघाले आहेत. त्याचाच एक परिणाम आज मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर दिसून आला आहे.

मुंबईहून पुण्यात जाताना पहिलाच टोलनाका लागतो. तसेच हा एक्स्प्रेस पार पडण्यासाठी प्रवाशांना नेहमीपेक्षा तिप्पट ते चौपट वेळ लागतो. खालापूर टोल नाक्याजवळ वाहनांच्या दोन ते अडीच किमीच्या लांबच लांब वाहनांच्या रांगा लावल्या आहेत. फास्टॅगमुळे वाहनांच्या टोलवर रांगा लागणार नाही, असा विश्वास व्यक्त करण्यात आला होता. मात्र, हा विश्वास फोल ठरल्याची चर्चा रंगत आहे.

आज शनिवार, उ्दया रविवार आणि सोमवारी स्वातंत्र्यदिनासह मंगळवारी पारशी नववर्षाची सुट्टी सलग जोडून आल्यामुळे पर्यटक मोठ्या संख्येने मुंबईबाहेर जात आहेत. मात्र, वाटेत होत असलेल्या वाहतूक कोंडीने सगळ्या प्लॅनिंगचे वेळापत्रकही कोलमडले आहे. मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर अवजड वाहनांची संख्या वाढल्यामुळे असल्यानं वाहतुकीचा वेग मंदावलेला असतो. रस्त्यांवर भलेमोठे खड्डे पडल्यामुळे प्रवाशांची भर पावसात चांगलीच तारांबळ उडते.

मागील आठवड्याभरापासून राज्यातील काही भागांत पावसाला चांगलीच सुरूवात झाली आहे. सलगच्या सुट्ट्या डोळ्यांसमोर ठेवूनच महिनाभर आधी सहलीचे बेत आखले गेले. पण फक्त हायवेवरीलच कोंडी नव्हे तर पेट्रोल पंपावरील गर्दी देखील वाढली आहे. पेट्रोलच्या तुलनेने स्वस्त म्हणून सीएनजी वाहनांची संख्या वाढली आहे.


हेही वाचा : उपेक्षित, वंचितांना समाजाच्या विकासाच्या प्रवाहात येण्याचा अधिकार – राज्यपाल भगतसिंग कोश्यारी


 

First Published on: August 13, 2022 9:06 PM
Exit mobile version