कोल्हापुरातील ग्रामपंचायतीने घेतला विधवा प्रथेबद्दल ‘हा’ निर्णय

कोल्हापुरातील ग्रामपंचायतीने घेतला विधवा प्रथेबद्दल ‘हा’ निर्णय

Herwad Gram Panchayat in Kolhapur district has decided to stop the practice of widowhood

कोल्हापूर जिल्ह्यातील हेरवाड ग्रामपंचायतीने विधवा प्रथा बंद करण्याचा महत्वपूर्ण ठराव ग्रामसभेत पारित केला आहे. याबाबत माहिती दयानंद कांबळे यानी ट्विट करून दिली आहे. या सोबत त्यांनी ठरावाची ऐतिहासिक प्रत जोडली आहे. हा ठराव 4 मे 2022 रोजी करण्यात आला असून ठरावावर सूचक म्हणून मुक्ताबाई रूज पुजारी तर अनुमोदक म्हणून सुजाता केशव गुरव यांची नावे आहेत.

आपल्या समाजात पतीच्या निधनाच्या वेळी, अंत्यविधीच्या प्रसंगी पतीच्या कपाळावरचे कुंकू पुसणे, गळ्यातील मंगळसूत्र तोडने, हातातील बांगड्या फोडणे, पायातील जोडवी काढणे असे प्रकार करण्याची प्रथा आहे. त्या महिलेला विधवा म्हणून कोणत्याही प्रकारच्या धार्मिक, सामाजिक कार्यक्रमात सहभागी होता येत नाही. मात्र, कायदयाने प्रत्येक व्यक्तीला सन्मानाने जीवन जगण्याचा समान अधिकार दिला आहे. या प्रथांमुळे कायद्याचा भंग होत आहे. यामुळे आपल्या गावामध्ये व देशामध्ये विधवा महिलांनाही सन्मानाने जगता आले पाहिजे. यासाठी विधवा प्रथा बंद करण्यात येत आहे. या संदर्भात गावामध्ये जनजागृती करण्यात यावी. त्यास ही सभा मंजुरी देत आहे, असे या ठरावात म्हटले आहे. राजर्षी शाहू महाराजांच्या जिल्ह्यातील या ऐतिहासिक आणि क्रांतिकारक निर्णयाचे सर्वत्र स्वागत होत आहे.

 

यावेळी विधवा प्रथा बंद करण्याची संकल्पना सर्वप्रथम करमाळ्याच्या प्रमोद झिंगाडे यांनी संरपंच परिषदेच्या माध्यमातून मांडल्याचे सुरगोंडा पाटील यांनी सांगितले. गावागावात अशा प्रकारचे ठराव मांडायचे आणि यावर राज्य सरकारला कायदा करण्यास भाग पाडायचे. याच प्रक्रियेचा भाग म्हणून हेरवाडने हा ठराव पारित केल्याचे सरपंच सुरगोंडा पाटील यांनी सांगितले.

First Published on: May 9, 2022 10:30 AM
Exit mobile version