Hindustani Bhau: परिस्थितीमुळे बारमध्ये भांडीही घासली, आज लाखो फॉलोअर्स असणारा ‘हिंदुस्तानी भाऊ’ आहे तरी कोण?

Hindustani Bhau: परिस्थितीमुळे बारमध्ये भांडीही घासली, आज लाखो फॉलोअर्स असणारा ‘हिंदुस्तानी भाऊ’ आहे तरी कोण?

Hindustani Bhau: परिस्थितीमुळे बारमध्ये भांडीही घासली, आज लाखो फॉलोअर्स असणारा 'हिंदुस्थानी भाऊ' आहे तरी कोण?

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून दहावी बारावीच्या परीक्षा ऑफलाइन घेण्यात य़ेणार असल्याचे जाहीर केल्यानंतर विद्यार्थ्यांनी या निर्णयाचा विरोध दर्शवला नागपूरसह मुंबईतील धारावीत विद्यार्थी आक्रमक होऊन आंदोलन करताना दिसले. दरम्यान या आंदोलनाचा मुख्य सूत्रधार हा यूट्यूबर हिंदुस्तानी भाऊ असल्याचे समोर आहे. हिंदुस्तानी भाऊच्या व्हायरल व्हिडीओनंतर विद्यार्थ्यांनी आंदोलन केल्याचे म्हटले जात आहे. सोशल मीडियावर ‘पेहली फुरसत मे निकल’ असे म्हणाऱ्या या हिंदुस्तानी भऊचे व्हायरल व्हिडीओ नेटकऱ्यांसाठी काही नवीन नाहीत. परंतु एकेकाळी परिस्थितीमुळे बारमध्ये भांडी घासून आज लाखो फॉलोअर्स असणारा हिंदुस्तानी आहे तरी कोण आणि सोशल मीडियावर सतत त्याची इतकी चर्चा का होत असते? जाणून घ्या.

हिंदूस्थानी भाऊ सोशल मीडियावरचा एक प्रसिद्ध चेहरा असून त्याचे खरे नाव विकास जयराम पाठक आहे. त्याला बबलू पाठक नावाने देखील ओळखले जाते. सोशल मीडियावर फार कमी लोक असतील जे हिंदुस्तानी भाऊला ओळखत नाही. स्वत:ला राष्ट्रभक्त म्हणवून  हिंदुस्तानी भाऊने स्वत:ला सोशल मीडियावर प्रमोट केले आहे. हिंदुस्तानी भाऊ हा पेशाने एक यूट्यूबर असून पाकिस्तान आणि विरोधकांविरोधात बोलण्यासाठी त्याला ओळखले जाते. यूट्यूब, फेसबुकसारख्या सोशल मीडियाच्या माध्यमातून लोकांना अपशब्द वापरुन स्वत:चा मुद्दा मांडणे हे हिंदुस्तानी भाऊचे काम आहे. त्याच्या याच वागण्यामुळे त्याचा व्हिडीओ अपलोड होताच काही वेळातच व्हायरल होतो.

हिंदुस्तानी भाऊने आयुष्यात केलाय प्रचंड संघर्ष

सोशल मीडियावर लाखो रुपये कमावणारा हिंदुस्तानी भाऊने त्याच्या आयुष्यात फार संघर्ष केला आहे. हिंदुस्तानी भाऊ हा एका सर्वसामान्य मराठी कुटुंबातील मुलगा असून मुंबईच्या सेंट अँन्ड्रयुज हायस्कूलमधून 7वी पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. वडिलांची नोकरी गेल्याने कुटुंबाची आर्थिक परिस्थिती खालावली म्हणून भाऊने घरी न सांगता सातवीच शिक्षण सोडून दिले आणि एका बारमध्ये वेटर म्हणून काम केले . त्याचप्रमाणे हिंदुस्तानी भाऊने घरोघरी जाऊन अगरबत्या विकण्याचे काम देखील केले आहे.

पत्रकारितेसाठी मिळालाय पुरस्कार

मीडिया रिपोर्टनुसार, हिंदुस्तानी भाऊ दक्ष पोलीस टाइम्स नावाच्या एका मराठी वृत्तपत्रात पत्रकार म्हणून नोकरी करत होता. पत्रकारितेत भारदस्त कामगिरी केल्याने हिंदुस्तानी भाऊला 2011मध्ये मुंबईतील सर्वोत्कृष्ठ चीफ क्राइम रिपोर्टरचा पुरस्कार मिळाला होता. आदित्य युवा प्रतिष्ठान नावाची एक एनजीओ भाऊच्या नावावर असून त्याचा मुलगा सध्या या एनजीओचा कार्यभार सांभाळतो.

2014 मध्ये बनला यूट्यूबर

हिंदुस्तानी भाऊ पत्रकार असल्याने त्याला अनेक गोष्टींची माहिती होती. पत्रकारिता सोडून 2014मध्ये त्याने स्वत:चे यूट्यूब चॅनेल सुरू केले. यूट्यूब चॅलेनवर पाकिस्तानच्या मुद्द्यांवर सर्वांची शाळा घेण्याचे काम करत होता. पाकिस्तानी यूट्यूबर वकार जाकाची देखील हिंदुस्तानी भाऊने चांगलीच शाळा घेतली होती. दोघांचा लाइव्ह व्हिडीओ तेव्हा सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.

हिंदुस्तानी भाऊ चर्चेत कसा आला?

देशद्रोही लोकांना शिव्या देणारा एक व्हिडीओ पोस्ट केला होता. हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आणि भाऊचे फॉलोवर्स अचानक वाढले आणि भाऊ फेमस झाला. हिंदुस्तानी भाऊचे सगळे व्हिडीओ कारमध्ये शूटमध्ये केले असतात. भाऊच्या घरात शिव्या देणे मान्य नसल्याने त्याने आजपर्यंत घरी एकही व्हिडीओ शूट केलेला नाही. पहिली फुरसत मे निकल, जय हिंद दोस्तो, खतम हे भाऊचे काही डायलॉग सोशल मीडियावर प्रचंड ट्रेंडमध्ये आहेत.

बिग बॉसमध्ये केला होता राडा

हिंदुस्तानी भाऊची बिग बॉस 13 मध्ये स्पर्धक म्हणून निवड करण्यात आली होती. बिग बॉस 13मध्ये हिंदूस्तानी भाऊने चांगलाच धुमाकूळ घालून सर्व स्पर्धकांवर हिंदुस्तानी भाऊ भारी पडला होता. डोळ्यावर काळा चश्मा, हातात मोठे घड्याळ त्रिशूळाचे टॅटू आणि गळ्यात सोन्याच्या चैनी असा हिंदुस्तानी भाऊचा लूक सर्वांना आकर्षित करतो. भाऊ अभिनेता संजय दत्तचा फार मोठा फॅन असून त्याच्या अनेक व्हिडीओत त्याने संजय दत्तची मिमीक्री देखील केली आहे. संजय दत्त सोबतचा एक फोटो देखील आहे.

मीम्सच्या दुनियेतील राजा

हिंदुस्तानी भाऊ केवळ यूट्यूबवर नाही तर मिम्सच्या दुनियेत देखील प्रसिद्ध आहे. सोशल मीडियावर भाऊच्या सुपरहिट डायलॉगवर मिम्सचा पाऊस पडतो. हिंदूस्तानी भाऊचे यूट्यूबर 5 लाखांहून अधिक सब्स्क्राइबर असून हिंदुस्तानी भाऊ त्याच्या यूट्यूब चॅनेलवरुन महिन्याला 50 लाखांहून अधिक रुपये कमावतो.


हेही वाचा –  HSC SSC Exam : मुंबईतही विद्यार्थी ऑनलाइन परीक्षांसाठी आक्रमक ; गर्दी पांगवण्यासाठी पोलिसांचा लाठीचार्ज

First Published on: January 31, 2022 6:07 PM
Exit mobile version