अशी आहे शहरातील पॉझिटिव्ह रुग्णांची हिस्ट्री

अशी आहे शहरातील पॉझिटिव्ह रुग्णांची हिस्ट्री

Complaints about Ajmer Saundane Kovid Center

नाशिक जिल्हा प्रशासनास गुरुवारी (दि.४) दिवसभरात २७ नवे रूग्ण करोनाबाधित आढळले आहेत. पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये नाशिक शहर १४, मालेगाव ७, जामनेर, पारोळा, ओझर व येवला येथील प्रत्येकी एक आणि मुलुंडमधील दोनजणांचा समावेश आहे. मालेगावमधील पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये दोन चिमुकल्यांचा समावेश आहे. आता नाशिक जिल्ह्यात एकूण रुग्णांची संख्या १ हजार ३८४ वर पोहोचली आहे. एकट्या नाशिक शहरात २८८ बाधित रुग्ण आहेत. जिल्ह्यात गुरुवारपर्यंत १२ हजार ९१० संशयित रुग्णांचे स्वाब तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. यामध्ये १ हजार ३८४ रुग्ण बाधित असून ११ हजार २६२ रुग्ण निगेटिव्ह आहेत. २६४ रुग्णांचे अहवाल प्रलंबित आहेत.

नाशिक करोना अहवाल
पॉझिटिव्ह रुग्ण-१३८४ (मृत ७९)
नाशिक शहर-२८८ (मृत १३)
मालेगाव शहर-८११ (मृत ५५)
नाशिक ग्रामीण-२२१ (मृत ६)
अन्य – ६४ (मृत ५)

६ वर्षीय मुलगा पॉझिटिव्ह
बिडी कामगारनगर, पंचवटी येथील ५७ वर्षीय बाधित रुग्णाचा १ जून रोजी मृत्यू झाला आहे. त्याच्या संपर्कात आलेल्या रुग्णांचे स्वाब तपासणीसाठी पाठविले असता २५ वर्षीय व ५३ वर्षीय महिला व ६ वर्षीय मुलाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.

पेठरोड परिसरात एक रुग्ण बाधित
पंचवटीतील पेठ रोड परिसरात करोनाने धुमाकूळ घातला आहे. या परिसरात गुरुवारी पुन्हा ४२ वर्षीय पुरुषाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. पॉझिटिव्ह रुग्ण हायरिस्क कॉन्टॅक्टमधील आहे. खबरदारी म्हणून रुग्णाच्या संपर्कात आलेल्यांना आरोग्य विभागाने क्वारंटाईन केले आहे.

करोनाबाधित पोलिसाचे मालेगाव कनेक्शन
मालेगावात कर्तव्य बजावत असताना आत्तार्पंत दीडशेहून अधिक पोलीस कर्मचार्‍यांना करोनाची लागण झाली असून १४४ पोलीस करोनामुक्त झाले आहेत. तरीही, मालेगावी कर्तव्य बजावत असलेले व नाशिक शहरातील रहिवाशी असलेले ३५ वर्षीय पोलीस कर्मचारी करोनाबाधित असल्याचे अहवालावरुन निष्पन्न झाले आहे.

हिरावाडीत महिला पॉझिटिव्ह
दत्त मंदिर,त्रिमुर्ती नगर, हिरावाडी पंचवटी येथील ४६ वर्षीय महिलेचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. खबरदारी म्हणून आरोग्य विभागाने संपर्कात आलेल्यांना क्वारंटाइन केले आहे.

नामको रुग्णालयाजवळ ३० वर्षीय पुरुष बाधित
देवपूजा अपार्टमेंट, नामको हॉस्पिटलजवळ, पेठरोड येथील ३० वर्षीय पुरुषाचा अहवाल करोनाबाधित असल्याचा प्राप्त झाला आहे. सदर व्यक्ती बाधित रुग्णाच्या संपर्कात आला असून त्याच्या संपर्कातील नातलग व नागरिकांना आरोग्य विभागाने क्वारंटाईन केले आहे.

हाय रिस्कमधील ५ रुग्ण बाधित
शिवशक्ती चौक,सिडको येथील ३५ वर्षीय पुरूष, दत्तनगर, पंचवटी येथील ५५ वर्षीय पुरुष, चक्रधर को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी, टाकळी रोड येथील ६३ व २९ वर्षीय पुरुष आणि सागर कॅस्टल, पखाल रोड, द्वारका कॉर्नर येथील ३६ वर्षीय पुरूषाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. हे सर्व रुग्ण हाय रिस्क कॉन्टॅक्टमधील आहेत.

First Published on: June 4, 2020 8:41 PM
Exit mobile version