अशी आहे नाशिक शहरातील पॉझिटिव्ह रुग्णांची हिस्ट्री

अशी आहे नाशिक शहरातील पॉझिटिव्ह रुग्णांची हिस्ट्री

देशात समूह संसर्गास सुरुवात IMAचा इशारा

नाशिक शहरात करोनाने धुमाकूळ घातला आहे. जिल्हा प्रशासनास शुक्रवारी (दि.२९) दिवसभरात १३ रुग्णांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह असल्याचा प्राप्त झाला आहे. यामध्ये नाशिक ग्रामीण पोलीस दलातील दोन, नाशिक शहरात ८ आणि नांदगाव शहरातील तीनजणांचा समावेश आहे. शहरातील पॉझिटिव्ह रुग्ण हाय रिस्क कॉन्टॅक्टमधील आहेत. जिल्ह्यात एकूण १ हजार १२१ रुग्ण करोनाबाधित असून एकट्या नाशिक शहरात १६२ रुग्ण बाधित आहेत.

मुंबईहून आलेला रुग्ण पॉझिटिव्ह
सिताराम कॉलनी, गोदापार्क, रामवाडी येथील ३१ वर्षीय पुरुष मुंबईहून कंपनीच्या कामानिमित्त नाशिकमध्ये आला होता. त्यांच्यात करोनासदृश्य लक्षणे दिसून आल्याने त्यांचे स्वाब तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे.

हायरिस्क कॉन्टॅक्टमधील मुलगी पॉझिटिव्ह
पंचवटीतील महालक्ष्मी थिएटर परिसरात एक रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आला. खबरदारी म्हणून महापालिकेने रुग्णाच्या कुटुंबातील १६ वर्षीय मुलीच्या घशाचे स्वाब तपासणीसाठी पाठविले असता तिचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.

लेखानगरमध्ये वयोवृद्ध रुग्ण पॉझिटिव्ह
लेखानगर, सिडको येथील ६२ वर्षीय पुरुषास २७ मे रोजी त्रास होत असल्याने खासगी रुग्णालयात तपासणीसाठी दाखल त्यांचे स्वाब घेण्यात आले होते. शुक्रवारी (दि.२९) त्यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह असून त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

जुने नाशिकमधील ७० वर्षीय पुरुष पॉझिटिव्ह
कमोदगल्ली, जुने नाशिक येथे वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत असणारे व गणेशनगर (कर्मा हाईटस) द्वारका परिसरातील ७० वर्षीय पुरुषाचा अहवाल करोनाबाधित आला आहे. ते बाधित रुग्णाच्या संपर्कात आल्याने त्यांना करोनाची लागण झाली आहे.

रुग्णाच्या संपर्कातील ३४ वर्षीय रुग्ण पॉझिटिव्ह
क्रांतीनगर येथील रुग्णाच्या संपर्कात आलेल्या गणेशवाडी,पंचवटी येथील ३४ वर्षीय व्यक्तीमध्ये करोनासदृश्य लक्षणे दिसून आली. त्यांच्या घशाचे स्वाब तपासणीसाठी पाठविण्यात आले असता त्यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

नातेवाईकांमुळे २६ वर्षीय पुरुष बाधित
नातेवाईकांच्या संपर्कात आल्याने सिन्नरफाटा येथील २६ वर्षीय पुरुषामध्ये करोनासदृश्य लक्षणे दिसून आली. त्यांच्या घशाचे स्वाब तपासणीसाठी पाठविले असता शुक्रवारी त्यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला.
त्यांच्यावर सिन्नरमध्ये उपचार सुरू आहेत.

First Published on: May 29, 2020 8:24 PM
Exit mobile version