सोलापुरात ‘ऑनर किलींग’ तरुणीला दिले विष

सोलापुरात ‘ऑनर किलींग’ तरुणीला दिले विष

(फोटो प्रातिनिधिक आहे)

सोलापुरमध्ये प्रेमविवाह करणाऱ्या अनुराधाला या तरुणीला तिच्या आई-वडिलांनी विष पाजून तिची हत्या केल्याची धक्कादायक घटना मंगळवारी घडल्याचे समोर आले आहे. या घटनेमुळे सोलापुर परिसरात खळबळ उडाली आहे. आपल्या मुलीने प्रेमविवाह केल्याने तिची हत्या केल्याचे उघड झाले आहे. या प्रकरणातील आरोपीस मदत करणारे प्राथमिक आरोग्य केंद्रातील अधिकारी डॉ. संजय कांबळे घटना घडल्यापासून पसार झाल्याची माहिती समोर आली आहे.

नेमके काय घडले?

सोलापुर येथे अनुराधा या तरुणीचे एका मुलावर प्रेम होते. मात्र या प्रेमाला तिच्या आई-वडिलांचा विरोध होता. विरोध असताना देखील अनुराधाने आई-वडिलांच्या विरोधात जाऊन त्या मुलाशी विवाह केला. आपल्या मुलीने आपले न ऐकता प्रेमविवाह केल्याचे तिच्या आई-वडिलांना पटले नाही. त्यांनी याचा बदला घेण्याचे ठरवले. अनुराधाच्या आई-वडिलांनी तिला डाळिंब पिकावर फवारायचे सिजर हे विषारी औषध डॉक्टरांच्या मदतीने मुलीला पाजण्यात आले. यामध्ये अनुराधा हिचा मृत्यू झाल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.

डॉक्टर कांबळे फरार

ज्या दिवशी ही घटना घडली आहे. तेव्हापासून डॉ. संजय कांबळे हे फरार असल्याचे समोर आले आहे. दरम्यान, कोणतीही रजा न देता किंवा वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती न देता डॉ. कांबळे गायब झाले आहेत. या गुन्ह्यातील काही आरोपी अजूनही मोकाट असून त्यांना कशा पद्धतीने पोलीस चौकशीसाठी ताब्यात घेतील. याविषयी चर्चा सुरू आहे. मात्र या घटनेमागचे गुढ उकलण्यात पोलिसांना यश आले असून आरोपीने मंगळवारी अनुराधाला मारलेले ठिकाण दाखवले असून त्या ठिकाणाहून पोलिसांनी बेडशिट, विषारी औषधाची बाटली आणि रिकामा ग्लास जप्त केला आहे.

First Published on: October 11, 2018 7:38 PM
Exit mobile version