पूरग्रस्तांना सरकार घर बांधून देणार; मुख्यमंत्र्यांनी केली मदतीची घोषणा

पूरग्रस्तांना सरकार घर बांधून देणार; मुख्यमंत्र्यांनी केली मदतीची घोषणा

पूरग्रस्तांसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केल्या मदतीबाबत घोषणा

सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यात आलेल्या महापूरामुळे दोन्ही जिल्ह्यांचे प्रचंड नुकसान झालेले आहे. पुराचे पाणी ओसरले आहे, मात्र आता जनजीवन सुरळीत करण्यासाठी सरकारचे प्रयत्न सुरु आहेत. पुरामुळे राहत्या घरांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते, यावर सरकारने आता महत्त्वाचा निर्णय घेतला असून “पंतप्रधान आवास योजनेमार्फत जी घरे पडलेली आहेत किंवा घरांना हानी झालेली आहे. अशा घरांना पुर्णपणे नव्याने बांधून दिले जाणार आहेत. त्याशिवाय १ लाख रुपये अतिरीक्त राज्य सरकारच्यावतीने दिले जाणार आहेत”, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केले आहे. तसेच पूरपरिस्थिती पुन्हा निर्माण होऊ नये यासाठी एक समिती निर्माण केली आहे. या समितीमार्फत पूरपरिस्थितीची चौकशी आणि भविष्यातील उपाययोजना योजल्या जातील. जलसंपदा विभागाचे निवृत्त प्रधान सचिव नंदकुमार वडनेरे हे समितीचे अध्यक्ष असतील

मुख्यमंत्र्यांनी केलेल्या घोषणा –

पूर ओसरल्यानंतर केलेल्या उपाययोजना – 

जनजीवन सुरळीत करण्यासाठी वेगाने प्रयत्न सुरु आहेत.

एमएसईबीच्या ६०० टीम्स अहोरात्र काम करत आहेत.

सफाईचे काम युद्धपातळीवर सुरु आहे.

रोगराई, महामारी पसरू नये, यासाठी प्रतिबंधात्मक उपाय राबविण्यात आले आहेत.

पाण्याच्या योजना सुरु केल्या आहेत.

समितीने दिलेल्या शिफारशीवर काम केले जात आहे. तसेच समिती प्रत्येक आठवड्याला बैठक घेऊन कामाचा आढावा घेऊ.

 

First Published on: August 19, 2019 4:46 PM
Exit mobile version