वर्क फ्रॉम होम करताना मुलांची लुडबूड? मग हे करून बघा!

वर्क फ्रॉम होम करताना मुलांची लुडबूड? मग हे करून बघा!

कोरोनाचा वाढत जाणारा प्रसार रोखण्यासाठी देशात लॉकडाऊन जाहीर करण्यात आलं आहे. लॉकाऊनमुळे सगळेच व्यवहार बंद झाले आहेत. ऑफिसेस, कॉलेज, शाळा सगळं बंद करण्यात आलं आहे. त्यामुळे अनेक कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉर्म होमच्या सुचना दिल्या आहेत. जवळजवळ १७ ते १८ दिवस झाले. सगळे घरातून काम करत आहेत. पण आतापर्यंत तुमच्या लक्षात आलं असेल की मुलांना सांभाळून घरात काम करणं किती कठीण आहे ते.

या विषयी प्रसिध्द चाईल्ड सायकोलॉजिस्ट शैलजा सेन यांनी इंडिया टूडेला माहिती दिली आहे. डॉ. शैलजा यांनी वर्क फ्रॉम होमबरोबर मुलांना कसे सांभाळाय याच्या काही टिप्स दिल्या आहेत.

डॉ. शैलजाने सांगतिलं आहे की, मुलांच्या बाबतीत पालकांनी कधीच तडजोड करू नका. वर्क फ्रॉम होम असो किंवा तुम्ही ऑफिसमधून काम करत असाल. मुलांच्या कोणत्याचबाबतीत तडजोड करू नका. त्यांना याची खात्री करून दिली पाहिजे की तुम्ही ऐकटे नाही आहात.

वर्क फ्रॉर्म करत असताना तुम्ही तुमच्या मुलाला सगळ्यात आधी याबबात कल्पना देणं आवश्यक आहे. त्याचबरोबर संपूर्ण दिवसाचं तुमचं शेड्यूल समजावून सांगा. त्यामध्ये तुम्ही कधी स्वयंपाक बनवणार आहात, कधी ऑफिसचं काम करणार आहात. या सगळ्यातील बारकावे त्यांना समजावून सांगा.

या गोष्टीचा होईल फायदा

या काळात मुलांना जास्त कंटाळा येतो. अशावेळी त्यांना छोट्या छोट्या घरकामात गुंतवा. त्यामुळे त्यांचा वेळही चांगला जाईल आणि तुमच्यावरचा ताणही कमी होईल. मुलांसाठी नवनवीन प्रयोग करा. मुलं कामात जास्त गुंतूंन राहतील याकडे लक्ष द्या. ऑफिसचं काम आणि घरचं कामाचा ताण तुमच्यावर येणार नाही.


हे ही वाचा – ‘विद्यार्थ्यांना थेट बारावीच्या वर्गात पाठवा’ – शिक्षकांची मागणी


 

First Published on: April 13, 2020 9:18 PM
Exit mobile version