हायड्राची टॅक्सीला धडक

हायड्राची टॅक्सीला धडक

प्रवासी उतरण्यासाठी थांबलेल्या टॅक्सीला वेगात चाललेल्या हायड्राची धडक बसून अपघात झाल्याची घटना खोपोली पेण राज्यमार्गावर घडली. सुदैवाने अपघातात कोणीही जखमी झाले नसले तरी टॅक्सीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
रविवारी दुपारी तीनच्या सुमारास किरण अनंत पाटील (41, रा.आत्करगाव, ता.खालापूर )हे त्यांची इको टॅक्सी (एमएच 46 बीएफ 3930) घेऊन खोपोली फाटा ते वावोशी असे प्रवासी घेऊन जात होते. तांबाटी गावानजीक प्रवाशांना उतरण्यासाठी किरण याने इंडिकेटर देऊन रस्त्यालगत टॅक्सी थांबवली. प्रवासी उतरुन दरवाजा लावत असताना त्याच दरम्यान पाठीमागून येणारा हायड्रा क्रंमाक एमएच 46-बीके -7027 या वरील चालकाला टॅक्सीचा अंदाज न आल्याने हायड्राची जोरदार धडक टॅक्सीला बसली. धडकेत टॅक्सीची मागील बाजू चेपली जावून टॅक्सीचा चालक बाजूचा दरवाजा तुटून खाली पडला. हायड्रा चालकाने घटनास्थळावरून पळ काढला असून अतिवेगात निष्काळजीपणामुळे हायड्रा चालवून अपघात केल्या प्रकरणी भादवी.सं.कलम 279 मोटार वाहन अधिनियम 1988 चे कलम 184 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. अधिक तपास पोलीस हवालदार प्रशांत म्हात्रे करीत आहेत.

First Published on: August 20, 2019 1:16 AM
Exit mobile version