मुंबईतलं शिवाजी पार्क भरून दाखवायचंय

मुंबईतलं शिवाजी पार्क भरून दाखवायचंय

आता मी राज्यात फिरणार आहे. गावोगावी जाऊन पाहणी करणार आहे. कोरोना असला तरी फिरणार आहे. रस्त्यावर कसे उतरायचे हे मला चांगलंच माहीत आहे. आता नुसते भगवान गडावरच नाही तर आपल्याला मुंबईतले शिवाजी पार्कही भरून दाखवायचेआहे. आपली शक्ती दाखवून द्यायची आहे, अशी घोषणा भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी केली आहे.

भगवान गडावर आयोजित दसरा मेळाव्याला पंकजा मुंडे संबोधित करत होत्या. यावेळी कोण आली कोण आली महाराष्ट्राची वाघीण आली, अशा जोरदार घोषणा पंकजा मुंडेंच्या कार्यकर्त्यांनी दिल्या. पंकजा म्हणाल्या की, आपल्याला कुणीच हात लावू शकत नाही. बजेट कसे घ्यायचे आणि काम कसे करायचे हे मी जाणते. बीड माझी जन्मभूमी आणि कर्मभूमी आहे. मी जिथे आहे तिथेच आहे. मी शर्यतीत असेन आणि तोडणार्‍यांना उत्तर देईन, असे म्हणत पंकजा मुंडेंनी राजकीय विरोधकांना इशारा दिला.

आजही माझ्याकडे कुठलंच पद नाही. संपत्ती कमी झाली तरी चालेल पण माझ्या दारातली गर्दी कधी कमी होता कामा नये, अशीच मी प्रार्थना करते, असं भाजपा नेत्या पंकजा मुंडे म्हणाल्या आहेत. भगवान गडावर उपस्थितांना संबोधित करताना त्या बोलत होत्या. ऊसतोड कामगारांसाठीच माझा कारखानाही मी उशिरा सुरू केला. कारण माझ्या कामगारांचा संप सुरू आहे. बोलणार्‍याचं काय जातं, जा तुम्ही संप करा म्हणून सांगतात. मुंबईत बसून निर्णय होत नाहीत.

मी निवडणुकीत पराभूत झाले, तर माझ्या कार्यकर्त्यांनाच जास्त वाईट वाटलं. मी पक्षाची राष्ट्रीय मंत्री झाली असल्याचेही पंकजा मुंडेंनी अधोरेखित केले आहे. बीड माझी जन्मभूमी आणि कर्मभूमी आहे. मी जिथे आहे तिथेच आहे. मी शर्यतीत असेन आणि तोडणार्‍यांना उत्तर देईन. मुंडेंच्या विचारांची जबाबदारी माझ्यावर आहे. मला तुमच्या कर्जात राहायला आवडेल, असंही उपस्थितांना संबोधून त्या म्हणाल्या. लॉकडाऊनमध्ये ऊसतोड कामगारांच्या भाकरी भिजत होत्या, आम्हाला खायला काही नाही, व्हिडिओ कॉल करून ते दाखवत होते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे माझे भाऊच आहेत, त्यांनी प्रेमानं विचारलं किती आदळआपट करशील, तर मी म्हणाले ऊसतोड कामगारांसाठी आदळआपट करावीच लागेल. ठाकरे सरकारनं शेतकर्‍यांना दिलेल्या 10 हजार कोटींच्या पॅकेजवरही पंकजा मुंडेंनी टीका केली. शेतकर्‍यांना भरघोस मदतीची गरज असल्याचंही त्यांनी सांगितलं.

या दसर्‍या मेळाव्याला कोणीही येऊ नये, असं मी सांगितलं आहे. परंतु, ऑनलाईन मेळावा असतानाही बरेच लोक आले आहेत. हेलिकॉप्टरनं येण्याची परंपरा होती, पण कोरोनामुळे ही हेलिकॉप्टरऐवजी गाडीनं आले. अतिवृष्टीनं शेतकरी बेजार झाला आहे. भगवान बाबांची मूर्ती माझ्या पाठीशी आहे. भगवान बाबा आशीर्वाद पाठीशी आहे हे इथे येताना जाणवत होतं. माझे बंधू महादेव जानकर यांच्याशिवाय माझा कोणताही कार्यक्रम पूर्ण होत नाही. या नात्याला कोणाची दृष्ट लागू नये, असंही पंकजा मुंडे म्हणाल्या आहेत. विजयादशमीच्या मी सर्वांना खूप खूप शुभेच्छा देते, विजयादशमीला सीमोल्लंघन होत असतो. ही जबाबदारी खूप मोठी आहे. भगवान गडाकडे येताना गावोगावी माझं स्वागत केलं जात होतं. शेतकर्‍यांनी प्रेमानं फुलं देऊन भगवान बाबांना अर्पण करायला सांगितली हे पाहून माझं मन भरून आलं. लोकांच्या प्रेमानं मी भारावून गेले. ही लोक एवढी का प्रेम करतात, तेव्हा मागे वळून पाहिलं तर भगवान बाबांची मूर्ती दिसली आणि मुंडेसाहेबांची कीर्ती सोबत दिसली, असंही पंकजा मुंडे म्हणाल्या आहेत.

त्या पॅकेजमध्ये रुमालही येत नाही

यावेळी मुंडे यांनी राज्य सरकारने जाहीर केलेल्या दहा हजार कोटींच्या पॅकेजवरही घणाघाती टीका केली. १० हजार कोटींचे पॅकेज सरकारनं घोषित केलं. हे पॅकेज पुरेसं नाही. या दहा हजार कोटींच्या पॅकेजमध्ये साधा रुमालही येणार नाही, अशी टीकाही त्यांनी केली. या पॅकेजने शेतकरी, ऊसतोड कामगारांची दिवाळी कशी गोड होणार? असा सवाल करतानाच सरकारला हे पॅकेज वाढवण्याची मागणी करणार असल्याचंही त्या म्हणाल्या.

120 आमदार बनवायचे आहेत

सध्या रात्र वैर्‍याची आहे. त्यामुळे सजग राहा. आपली वज्रमुठ कायम ठेवा. आपली वज्रमुठ कायम असेल तर मोठमोठी सत्ताही हादरून जाते. आपल्याला धर्मकारण आणि राजकारणाची सांगड घालायची आहे. या दोन्ही गोष्टी एकत्र केल्याशिवाय समाजाचा विकास होऊच शकत नाही. आपल्याला राज्यात 120 आमदार बनवायचे आहेत, असं त्या म्हणाल्या.

First Published on: October 25, 2020 11:47 PM
Exit mobile version