मी थकणार नाही , मी झुकणार नाही, संघर्ष कुणाला चुकलेला नाही- पंकजा मुंडे

मी थकणार नाही , मी झुकणार नाही, संघर्ष कुणाला चुकलेला नाही- पंकजा मुंडे

संघर्ष कुणालाच चुकलेला नाही. छत्रपतींनाही संघर्ष करावा लागला. संघर्षाचा काळ प्रत्येकाच्या आयुष्यात असतो. पण मी थकणार नाही आणि कुणासमोर झुकणारही नाही असा इशाराच भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी आज दिला. दसऱ्यानिमित्त भगवान गडावर आयोजित करण्यात आलेल्या मेळाव्यात त्या बोलत होत्या. यावेळी आपल्या भाषणातून पंकजा यांनी त्यांची मनातील खदखदच व्यक्त केली. यावेळी पंकजा यांना ऐकण्यासाठी मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांनी आणि समर्थकांनी गडावर एकच गर्दी केली होती.

यावेळी संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून असलेल्या शिंदे गट आणि उद्धव ठाकरे गटाच्या दसऱ्या मेळ्यावरही पंकजा यांनी भाष्य केले. त्या म्हणाल्या की यांचे मेळावे म्हणजे राजकीय चिखलफेक आहे. पण आपले मेळावा चिखल फेकणाऱ्यांचा नाही तर चिखल तुडवणाऱ्यांचा आहे. चिखल तुडवण संघर्ष करणं आमच्या रक्तातच असल्याचे पंकजा यांनी म्हटले. तसेच मी कधीही कुणावर वैयक्तिक आरोप केले नाही की कधी संधीचा फायदाही घेतला नाही कारण ते आमच्या रक्तातच नसल्याचे भाष्य पंकजा यांनी यावेळी केले.

तसेच पंकजा यांनी नवरात्रीचा उल्लेख करतया नऊ दिवसात देवीची आराधना करत तिला डोंगरकपारीतील लोकांना चांगले दिवस येऊ देत अस मी साकडे घालणार असल्याचही यावेळी त्या म्हणाल्या. त्याचबरोबर स्वाभीमानाचं जीवन मागेन आणि मृत्यू देखील स्वाभीमानाने येऊ देत असंही पंकजा म्हणाल्या. त्याचबरोबर संघष कोमालाही चुकलेला नाही. गोपीनाथ मुंडे साहेबांच्या ४० वर्षाच्या राजकारणात साडेचार वर्ष सत्तेची सोडली तर बाकीचे वर्ष संघर्ष होता. त्यापुडे माझा संघर्ष काहीच नसल्याचे त्या म्हणाल्या.

First Published on: October 5, 2022 3:40 PM
Exit mobile version