होय ! माझ्यापासूनच सुरूवात का नाही ?, सनदी अधिकाऱ्याचा सरकारी हॉस्पिटलमध्येच प्रसुतीला प्राधान्य

होय ! माझ्यापासूनच सुरूवात का नाही ?, सनदी अधिकाऱ्याचा सरकारी हॉस्पिटलमध्येच प्रसुतीला प्राधान्य

सनदी अधिकारी किरण पासी यांनी शासकीय हॉस्पिटलमध्ये मुलाला जन्म दिला आहे

आदिवासी बहुल अशा झारखंड राज्यात सरकारी हॉस्पिटलच्या यंत्रणेवर लोकांचा विश्वास बसावा यासाठी एका सनदी अधिकाऱ्याने स्वतःपासूनच एक मोठा निर्णय घेतला. एखादे खाजगी हॉस्पिटल परवडण्यासारख असतानाही झारखंडमधील आएएस अधिकारी किरण पासी यांनी एका नवा आदर्श समाजापुढे आणि सनदी अधिकाऱ्यांमध्येही ठेवला आहे. स्वतःच्याच प्रसुतीसाठी मुद्दाम सरकारी हॉस्पिटलमध्ये जाण्याचा पर्याय निवडला. सरकारी हॉस्पिटलमधील उपचारासाठी अनास्था, सेवांमधील दिरंगाई आणि स्वच्छता अशा अनेक कारणांमुळे नागरिकांकडून सरकारी हॉस्पिटलला नाक मुरडले जाते. सरकारी हॉस्पिटलमध्ये प्रसुतीसाठीचा निर्णय घेतल्याने त्यांचे सोशल मिडियावर मोठे कौतुक होत आहे. त्यांची सिझेरीयन डिलव्हरी होऊन त्यांनी एका मुलाला जन्म दिला आहे.

सनदी अधिकारी किरण पासी

झारखंडमधील गोड्डा जिल्ह्या्या ४८ व्या सहाय्यक आयुक्त म्हणून त्यांच्याकडे जबाबदारी आहे. सनदी अधिकारी होण्याआधी त्यांनी पश्चिम बंगालच्या कृष्णा नगरमध्ये शिक्षण घेतले होते. त्यानंतर स्पर्धा परीक्षांना सामोर जात त्यांनी प्रोविजनल सिविल सर्व्हीस ही परीक्षा उत्तीर्ण केली. नोकरी करतानाच त्यांनी सनदी अधिकारी पदाची परीक्षा तिसऱ्या प्रयत्नात पास केली. किरण पासी या २०१३ बॅचच्या सनदी अधिकारी आहेत. अतिशय कडक शिस्तीच्या अधिकाऱ्यांमध्ये त्यांची गणना होते. गोड्डा जिल्ह्यात आरोग्य सेवा सुधारण्यासाठी त्यांनी केलेल्या प्रयत्नांमुळेच गोड्डातल्या सरकारी हॉस्पिटलला सप्टेंबर २०१९ मध्ये केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाचा कायाकल्प पुरस्कार मिळाला. त्यांनी शिक्षण व्यवस्था सुधारण्यासाठीही अथक मेहनत घेतली आहे. झारखंडमध्ये त्या काम करत असलेल्या गोड्डा जिल्ह्याचा बहुतांश भाग हा जंगलाने व्यापला आहे. खाणींमध्ये काम करून मजूरी मिळवणे हाच एकमेव व्यवसाय या भागातील लोक करतात. अतिशय कमी उत्पन्न असणाऱ्यांना खाजगी हॉस्पिटल्स परवडत नसल्यानेच किरण पासी यांनी हे उचलले पाऊल धाडसीच म्हणाव लागेल. याआधी तेलंगणातील मुलुगू जिल्ह्याचे कलेक्टर अकुनुरी मुरली यांनीही २०१७ मध्ये आपल्या मुलीच्या बाळंतपणासाठी मुलुगू या सरकारी हॉस्पिटलची निवड केली होती. पण स्वतःच बाळंतपण सरकारी हॉस्पिटलमध्ये करून घेण्यासाठी किरण पासी यांचा पुढाकार एक नक्कीच नवा आदर्श समाजापुढे ठेवणारा असा आहे.

झारखंडचे आरोग्य मंत्री बन्ना गुप्ता यांनी एका ट्विटच्या माध्यमातून सनदी अधिकाऱ्याच्या धाडसाच कौतुक केले आहे. ही फक्त बातमी नाही, तर झारखंडमधील आरोग्य सेवा सुधारली असल्याचा पुरावा आहे. झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्या नेतृत्वाखाली आलेल सरकार जनतेची सेवा करण्यात तत्पर आहे. सोनिया गांधीचं स्वस्थ झारखंडची स्वप्नही पुर्ण करू असे झारखंडच्या मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले आहे.

First Published on: March 2, 2020 11:06 PM
Exit mobile version