राज्यात IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या सुरूच! आज ५ अधिकाऱ्यांची Transfer

राज्यात IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या सुरूच! आज ५ अधिकाऱ्यांची Transfer

एकीकडे राज्यातील प्रशासकीय यंत्रणा कोरोनाशी लढा देत असताना त्यांना वरीष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा देखील सामना करावा लागत आहे. कोरोनाच्या संकटकाळात राज्यात अनेक वरीष्ठ अधिकाऱ्यांच्या आत्तापर्यंत बदल्या करण्यात आल्या असून अजूनही हे बदल्यांचं सत्र सुरूच आहे. गुरुवारी राज्यातल्या उद्धव ठाकरे सरकारने ५ ज्येष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या IAS बदल्या केल्या आहेत. त्यामध्ये रायगडचे CEO आणि MHADA कार्याधिकाऱ्यांचा देखील समावेश आहे.

बदली करण्यात आलेले अधिकारी

१. अनुप कुमार यादव (कुटुंब कल्याण आयुक्त), यांची विशेष विक्रीकर आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

२. शिर्डीचे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) ए. के. डोंगरे यांची बांधकाम दुरूस्ती आणि पुनर्वसन विभागाचे CO म्हणून बदली करण्यात आली आहे.

३. विशेष विक्रीकर आयुक्त परीमल सिंह यांची कुटुंबकल्याण आयुक्त पदी नियुक्ती करण्यात आली आहे.

४. उपसचिव डॉ. किरण पाटील यांची रायगडचे CEO म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

५. मार्केटिंगचे MD योगेश म्हसे यांची MHADAचे CO म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

First Published on: July 23, 2020 4:40 PM
Exit mobile version