मंत्रिमंडळाचा विस्तार झाला तर तो बेकायदेशीर असेल, संजय राऊतांचा सरकारला टोला

मंत्रिमंडळाचा विस्तार झाला तर तो बेकायदेशीर असेल, संजय राऊतांचा सरकारला टोला

सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निकालामुळे राज्यातील शिंदे-फडणवीस सरकार बचावले आहे. 16 आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय हा सुप्रीम कोर्टाने विधानसभा अध्यक्षांवर सोपविला आहे. भाजपचे राहुल नार्वेकर हे विधानसभा अध्यक्ष असल्याने 16 आमदारांच्या बाबत काय निकाल येणार हे जवळपास निश्चित आहे. त्यामुळे आता सत्ताधारी पक्षातील आमदारांना वेध लागले आहे ते मंत्रिमंडळ विस्ताराचे. राज्यातील दुसऱ्या टप्प्यातील मंत्रिमंडळाचा विस्तार हा लवकरच होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. पण या मुद्द्यावरून विरोधकांनी आता सत्ताधाऱ्यांवर टीका करण्यास सुरूवात केली आहे.

हेही वाचा – बारावीच्या परीक्षेत मोठा घोटाळा; चौकशी समितीच्या अहवालाने खळबळ

ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत (Sanjay raut) हे सध्या नांदेड जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. देवेंद्र फडणवीसांचा काल (ता. 19 मे) रात्री दिल्ली दौरा झाल्याची माहिती आहे. हा दौरा मंत्रिमंडळ विस्ताराच्या पार्श्वभूमीवर झाल्याचे सांगण्यात येत आहे. याबाबत बोलताना संजय राऊत म्हणाले की, विस्तार होऊ तेव्हा बोलू. जर हा विस्तार झाला तर तो बेकायदेशीर असेल. अद्याप 16 आमदारांच्याबाबत पूर्ण निर्णय व्हायचा आहे. सर्वोच्च न्यायालयाची टांगती तलवार अद्यापही या सरकारवर आहे. अशा वेळेला सर्वोच्च न्यायालयाला डावलून विस्तार करणार असतील तर हे सरकार सर्वोच्च न्यायालयाला किंवा घटनेला जुमानत नाही, असे राऊतांनी यावेळी सांगितले.

मुनगंटीवार कोण?
संजय राऊतांना कोणती ऑफर होती, याबाबत संजय राऊतांनी सांगावे, असा खोचक प्रश्न भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी उपस्थित केला आहे. याबाबत बोलताना संजय राऊत म्हणाले की, मुनगंटीवार कोण? मला बोलायचे होते ते मी बोललो. ऑफर त्यांनी दिली होती का? जे 40 गेले आहेत त्यांना कोणत्या ऑफर होत्या. जे लोकं सोडून जातायंत त्यांना कोणत्या ऑफर होत्या. मी ऑफर नाही म्हणालो तर माझ्या शब्दात दबाव होता, असे राऊतांनी खडसावून सांगितले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath shinde) यांनी सुशासन म्हणून एक प्रयोग सुरू केला आहे. यांवर प्रतिक्रिया देत राऊत म्हणाले की, त्यांच्या तोंडून पहिल्यांदाच हा नवीन शब्ह ऐकतोय. तो दुशासन शब्द असेल चुकून ते सुशासन बोलले असतील, अशी टीका यावेळी राऊतांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर केली.

First Published on: May 20, 2023 10:10 AM
Exit mobile version