महाराष्ट्राने नाक दाबायचं ठरवलं तर तडफड होईल, संजय राऊतांची मोदींवर टीका

महाराष्ट्राने नाक दाबायचं ठरवलं तर तडफड होईल, संजय राऊतांची मोदींवर टीका

बेळगाव लोकसभा निवडणूकीच्या प्रचारासाठी शिवसेना नेते व खासदार संजय राऊत बेळगावमध्ये दाखल झाले आहेत. संजय राऊत यांनी एकिकरण समितीचा उमेदवारच विजयी होईल असे सूतोवाच केले आहे. संजय राऊत यांनी बेळगावमध्ये रोड शो केला. या वेळी संयुक्त महाराष्ट्र चौकीतील सभेसाठी महाराष्ट्र एकीकरण समितीने बांधलेले व्यासपीठ तोडले परंतु सभा होणारच असे संजय राऊत यांनी म्हटले होते. यानंतर संजय राऊत यांच्या सभेला परवानगी देण्यात आली या सभेत संजय राऊत यांनी मोदींवर आणि केंद्र सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. महाराष्ट्राने नाक दाबायचं ठरवलं तर तडफड होईल, तुम्हाला पश्चिम बंगालमधील अन्याय दिसतो, मग बेळगावातील दिसत नाही का? असा सवालही शिवसेना नेते संजय राऊत यांनी उपस्थित केला आहे.

बेळागावमध्ये सभेत बोलताना संजय राऊत यांनी म्हटले आहे की, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पश्चिम बंगालध्ये होणारा अन्या दिसत आहे. परंतु कर्नाटकमध्ये दिवसेंदिवस वाढत चाललेला अन्याय दिसत नाही आहे का? काश्मीरी पंडित नेहरुंनी केलेली चूक मोदींनी दुरुस्त केली मग कर्नाटकमध्ये झालेली चूकही दुरुस्त करा असे आवाहन संजय राऊत यांनी केले आहे. तानाशाही चालणार नाही. दादागिरीचा अधिकार आमच्याकडं आहे. आमचा जन्मच त्यासाठी झाला आहे. तानाशाही काय करताय, आम्ही हिटलरचे बाप आहोत. बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्राने मनात आणलं तर नाक दाबायचं ठरवलं तर तडफड होईल असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.

तसेच पुढे संजय राऊत यांनी म्हटले आहे की, एकीकरण समितीचा उमेदवार शुभम लहान आहे. परंतु वजनदार आहे. सीमाभागाचे वजन घेऊन तुला लोकसभेत यायचं आहे. शिवसेनेचे आता २१ खासदार आहेत. आणि तू २२ वा असशील, ही लढाई फक्त शुभमची नाही तर देशात जिथं जिथं मराठी माणूस आहे त्याच्या अस्मितेची आहे. छत्रपती शिवाजी महाराज असते तर पाकिस्तानाच्या सीमा करर्नाटकपर्यंत आल्या असत्या. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा जेसीबीने रात्री काढणाऱ्यांना लाज वाटली पाहिजे अशा शेलक्या शब्दात संजय राऊत यांनी कर्नाटक सरकारवर टीका केली आहे.

First Published on: April 14, 2021 11:02 PM
Exit mobile version