मुख्यमंत्र्यांनी माझी बदनामी भरून द्यावी नाही तर मी पुढचा निर्णय घेईन; बच्चू कडूंचे सूचक विधान

मुख्यमंत्र्यांनी माझी बदनामी भरून द्यावी नाही तर मी पुढचा निर्णय घेईन; बच्चू कडूंचे सूचक विधान

बच्चू कडू

राजकीय वर्तुळात नेते मंडळींचे एकमेकांवर आरोप – प्रत्यारोप सुरु असतानाच आमदार रवी राणा आणि माजी मंत्री बच्चू कडू यांच्यात वाद रंगला. दरम्यान हा वाद आज मिटण्याची शक्यता आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रवी राणा (MLA ravi rana)आणि बच्चू कडू (bachhu kadu) यांना मुंबईत बोलावून घेतले आहे. दरम्यान या दोघांचंही म्हणणं शिंदे – फडणवीस ऐकून घेऊन या वादावर योग्य तो तोडगा काढतील. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री या वादावर नेमका काय आणि कसा तोडगा काढणार या कडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

बच्चू कडू यांनी ‘खोके’ घेतले असा आरोप रवी राणा यांनी केला आणि राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले. रवी राणा यांनी आरोप केल्यांनतर मागील चार दिवस बच्चू कडू आणि रवी राणा यांच्यात आरोप – प्रत्यारोपाच्या फेऱ्या सुरु आहेत. दरम्यान या वादाने शेवटचे टोक गाठल्याने यात विनाकारण सरकारची बदनामी नको म्ह्णून मुख्यमंत्री शिंदे (cm eknath shinde) यांनी आणि उपमुख्यमंत्री फडणवीस (dcm devendra fadanvis) यांनी बच्चू कडू आणि रवी राणा यांना भेटीसाठी बोलावले आहे. आज रात्री ही भेट होऊन या दोघांमधल्या वादाचा निकाल लागण्याची शक्यता आहे.

हे ही वाचा –  बाबा घरी चलाना; शेतकऱ्यांसाठी उपोषणाला बसलेल्या कैलास पाटलांना लेकीची भावनिक साद

दरम्यान बच्चू कडू म्हणाले, ”रवी राणा यांनी माझ्यावर अत्यंत नीच असे रोप केले. त्यामुळेच माझ्या कार्यकर्त्यांच्या मनात तीव्र भावना आहेत. मी तोडफोड करावी आणि बाहेर पडावे अशी माझ्या कार्यकर्त्यांची इच्छा आहे. रवी राणा यांना भेटण्याची माझी इच्छा नाही. पण मुख्यमंत्री शिंदे काय बोलतात, ते बघू… माझी त्यांच्याकडून कोणतीच अपेक्षा नाही आहे. त्यांनी फक्त माझी झालेली बदनामी भरून द्यावी” असे माजी मंत्री बच्चू कडू म्हणाले.

याच संदर्भात पुढे बोलताना बच्चू कडू म्हणाले. “मी एक तारखेचा अल्टीमेटम दिला आहे. जर माझं समाधान झालं नाही तर मी निर्णय घेईन. १ तारखेच्या अल्टीमेटममध्ये कोणताही फेरबदल केले जाणार नाही. मी जे बोललो ते बोललो.. जर मला आज समाधानकारक उत्तर मिळालं नाही तर रात्री कार्यकर्त्यांशी बोलून मी पुढचा निर्णय घेईन”. असं विधानही बच्चू कडू यांनी केले.

हे ही वाचा –  एसआरए घोटाळ्यासाठी पेडणेकरांकडून मृत भावाच्या फोटोचा वापर, किरीट सोमय्यांचा कागदपत्रांसहित दावा

First Published on: October 30, 2022 4:09 PM
Exit mobile version