“कुटूंब मजबुत असेल तर घर फुटत नाही”; छगन भुजबळांची तांबेंच्या बंडावर प्रतिक्रिया

नाशिक : सत्यजीत तांबेंना उमेदवारी द्यावी असे सांगितले असते तर दिले असते. उमेदवारी घेऊन त्यांनी उमेदवारी अर्ज भरला नाही हे अतिशय वाईट झाले. यामुळे बाळासाहेब थोरात अडचणीत आले. शिवाय भाजपाचा पाठिंबा तांबे यांना मिळेल अस वाटत आहे. राजकारणात अशा गोष्टी होत असतात, पण आपलं कुटूंब मजबूत असेल तर घर फुटत नाही. काँग्रेसमध्ये काय झालं अजून कळाले नाही, अशी प्रतिक्रिया छगन भुजबळ यांनी दिली.

गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेल्या राजकीय घडामोडींवर आज छगन भुजबळ यांनी मौन सोडले. नाशिकमध्ये पत्रकार परिषद घेत त्यांनी तांबे कुटुंबाच्या निर्णयावर पहिली प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, डॉ. सुधीर तांबे दोन ते तीन वेळा आमदार झाले असून त्यांच्या बद्दल माझ्या मनात चांगल्या भावना आहेत. तांबे माझ्याकडे आले होते, त्यावेळी मी त्यांना पाठिंबा देतो असे सांगितले. गेल्या तीन वेळा आमदार असल्याने त्यांच्याबद्दल नागरिकांच्या देखील चांगल्या भावना आहेत. पण त्यांनी अचानक अस का केले, हे मला देखील कळाले नाही. शिवाय भाजपाचा पाठिंबा तांबे यांना मिळेल अस वाटत आहे. राजकारणात अशा गोष्टी होत असतात, पण आपलं कुटूंब मजबूत असेल तर घर फुटत नाही. काँग्रेसमध्ये काय झालं अजून कळाले नाही, अशी प्रतिक्रिया भुजबळ यांनी दिली. पंकजा मुंडे प्रकरणावर ते म्हणाले कि, राजकारणात वेगवेगळ्या कारणांमुळे नाराजी असते. कुठल्या न कुठल्या कारणामुळे नेते नाराज असतात. तसेच भाजपचे प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांच्याबाबत ते म्हणाले कि, बावनकुळे यांच्या बाबतीत मी ऐकत असतो. ते भाजपचे प्रदेशाध्यक्ष आहेत, म्हणून त्यांना बोलावे लागते. येणार्‍या निवडणुकीत समजेल कि, 184 होणार की कमी होणार आहेत. शिवाय कार्यकर्त्यांमध्ये उत्साह भरण्यासाठी बोलावे लागते. आमदार गेले तरी मतदार जातात असे नाही. असेही ते म्हणाले.

… मग डाटा का देत नाही

सर्वोच्च न्यायालयाने सांगितल्यानुसार हायकोर्टात जावे लागणार आहे. शिवाय ओबीसी आरक्षणाबाबतीत केंद्राची भूमिका अयोग्य आहे. अशी भूमिका घ्यायला नको होती. सुमित्रा महाजन यांच्या कमिटीने देखील ओबीसीने फंड द्यायला हवे असे सांगितले होते. माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांच्या काळात आलेल्या कमिटीनेही हीच भावना व्यक्त केली होती. डाटा नसल्यामुळे लाभ देता येत नाही, अस दोन्ही समित्यांनी सांगितले, मात्र भाजपला हे सगळ का अडचणीचे वाटते हे माहीत नाही. हा विषय राजकारणाचा नाही, मात्र ओबीसी पाठीराखे आहे, असे म्हणतात तर त्यांना डाटा द्यायला हवा असा खोचक टोला भुजबळांनी या माध्यमातून दिला.

First Published on: January 21, 2023 7:00 PM
Exit mobile version