ठाण्यातील घटनेनंतर मनसे आक्रमक, पत्र जाताच मालाडमधील फेरीवाल्यांवर कारवाई

ठाण्यातील घटनेनंतर मनसे आक्रमक, पत्र जाताच मालाडमधील फेरीवाल्यांवर कारवाई

ठाण्यातील घटनेनंतर मनसे आक्रमक, पत्र जाताच मालाडमधील फेरीवाल्यांवर कारवाई

ठाण्यातील सहायक आयुक्त कल्पिता पिंपळे यांच्यावर फेरीवाल्याने केलेल्या भीषण हल्ल्याची महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने गंभीर दखल घेतली आहे. फेरीवाल्यांवर तातडीने कारवाई करा अन्यथा आम्ही कारवाई करू असा इशारा मनसेने पोलिसांना दिला होता. या पार्श्वभूमीवर महापालिका आणि पोलीस प्रशासनाने २ सप्टेंबरला कुरार व्हिलेजमध्ये संजय नगर, पिंपरी पाडा, त्रिवेणी नगर, जैन मंदिर येथील अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाई केली. २ दिवसांपूर्वी ठाणे महापालिकेच्या माजिवडा- मानपाडा प्रभाग समितीच्या सहाय्यक आयुक्त कल्पिता पिंपळे यांच्यावर फेरीवाल्याने भीषण हल्ला केला होता. या हल्ल्यात कल्पिता पिंपळे यांच्या डाव्या हाताची दोन बोटे चक्क तुटून पडली आहेत.

ठाणे सहायक आयुक्त कल्पिता पिंपळे यांच्यावर फेरीवाल्याकडून करण्यात आलेल्या भीषण हल्ल्याची महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने चांगलीच दखल घेतली होती. ठाण्यातील प्रकार समजताच केतन नाईक यांनी ताबडतोब पोलीस ठाण्याला भेट दिली होती. यानंतर दिंडोशीचे विभाग अध्यक्ष अरुण सुर्वे यांनी प्रशासनाला पत्र लिहून फेरीवाल्यांवर कारवाई करण्याची विनंती केली. फेरीवाल्यांवर कारवाई करण्यात आली नाही तर मनसे स्टाईलने कारवाई करु असा धमकीवजा इशारा देण्यात आला होता. दिंडोशी विधानसभेचे उपविभाग अध्यक्ष केतन नाईक देखील यावेळी उपस्थित होते.

मनसेच्या पत्रानंतर धडक कारवाई

मनसेकडून फेरीवाल्यांवर कारवाई करण्यासाठीचे पत्र प्रशासनाला प्राप्त होताच फेरीवाल्यांर धडक कारवाई करण्यात आली आहे. कुरार व्हिलेजमधील संजय नगर, पिंपरी पाडा, त्रिवेणी नगर, जैन मंदिर येथील अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाई करण्यात आली आहे. तर कुरारमध्ये अजूनही अनेक ठिकाणी कारवाई होणे बाकी आहे पंरतु ही कारवाई तात्पुरती न करता कायमस्वरुपी करण्यात यावी अशी अपेक्षा मनसेने व्यक्त केली आहे.

काय आहे प्रकरण?

महापालिकेच्या माजिवडा- मानपाडा प्रभाग समितीच्या सहायक आयुक्त कल्पिता पिंपळे यांच्यावर फेरीवाल्याने भीषण हल्ला केला. या हल्ल्यात कल्पिता पिंपळे यांच्या डाव्या हाताची दोन बोटे तुटून पडली आहेत. तर हल्ल्यादरम्यान पिंपळे यांच्या संरक्षणासाठी धावलेल्या त्यांच्या सुरक्षारक्षकाचेही एक बोट तुटले आहे. या धक्कादायक घटनेमुळे ठाण्यात एकच खळबळ उडाली असून पोलिसांनी फेरीवाल्याला ताब्यात घेतले होते. अमरजित यादव असे आरोपी फेरीवाल्याचे नाव असून सध्या तो पोलिसांच्या ताब्यात आहे.

पिंपळे कारवाई करण्यासाठी गेल्या होत्या

मिळालेल्या माहितीनुसार ठाणे महापालिकेच्या माजिवडा-मानपाडा प्रभाग समितीच्या हद्दीत काही फेरीवले फिरत होतो. याच भागातील कासारवडवली नाक्यावर सहाय्यक आयुक्त कल्पिता पिंपळे या फेरीवाल्यांवर कारावाई करण्यासाठी गेल्या होत्या. यावेळी कारवाईच्या दरम्यान अमरजित यादव या माथेफिरु फेरीवाल्याने पिंपळे यांच्यावर चाकूने अचानकपणे हल्ला केला होता. पिंपळेंना वाचवण्यासाठी पुढे सरसारवलेल्या त्यांच्या सुरक्षा रक्षकाचेही एक बोट तुटले आहे. पिंपळे आणि सुरक्षा रक्षक या दोघांवरही ठाण्यातील रुग्णालयात उपचार सुरु आहेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कल्पिता पिंपळे यांची भेट घेऊन तब्येतीची काळजी घेण्याचे आवाहन केलं आहे.

First Published on: September 2, 2021 9:05 PM
Exit mobile version