महाराष्ट्रात लॉकडाऊन ३.० नंतर या गोष्टी सुरू, तर या बंद…

महाराष्ट्रात लॉकडाऊन ३.० नंतर या गोष्टी सुरू, तर या बंद…

कोरोनामुळे लॉकडाऊन ३.० पार्श्वभूमीवर राज्यात परवानगी देण्यात आलेल्या गोष्टी आणि बंदी कायम असलेल्या गोष्टी अशी यादी राज्य सरकारमार्फत जारी करण्यात आली आहे. प्रत्येक झोननुसार कोणत्या गोष्टींना परवानगी आणि कोणत्या गोष्टींना मज्जाव याचे स्पष्टीकरण एका तक्त्याच्या माध्यमातून देण्यात आले आहे. कोरोनासाठी करण्यात आलेल्या झोनच्या रचनेनुसार परवानगी आणि बंधने याचा खुलासा राज्य सरकारमार्फत करण्यात आला आहे. राज्यात ग्रीन, ऑरेंज, रेड, कंटेन्टमेंट, महापालिका क्षेत्र अशी वर्गवारी राज्य सरकारमार्फत करण्यात आली आहे. मॉल्स आणि प्लाझामधील दुकानांवर बंदी कायम ठेवण्यात आली आहे. अत्यावश्यक सेवेशिवाय सुरू राहणाऱ्या दुकानांसाठी स्थानिक यंत्रणेमार्फत वेळ निश्चित करण्याचे अधिकार देण्यात आले आहेत. मुख्यमंत्री कार्यालयाचे प्रधान सचिव भूषण गगराणी यांनी ही माहिती जाहीर केली आहे.

या गोष्टींना सगळ्या झोनमध्ये परवानगी

मालवाहतूक करण्यासाठी सर्व झोनमध्ये परवानगी देण्यात आली आहे. तसेच अत्यावश्यक सेवा पुरवणाऱ्या दुकानांनाही सुरू ठेवण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे. वैद्यकीय सेवेसाठी आपत्कालीन मदत देण्यासाठी परवानगी आहे.

या गोष्टींवर बंदी कायम

प्रवासाचे पर्याय असलेल्या ट्रेन, मेट्रो आणि हवाई वाहतुकीला सर्व झोनमध्ये बंदी कायम ठेवण्यात आली आहे. तसेच आंतरराज्य प्रवासासाठीही मज्जाव करण्यात आला आहे. शैक्षणिक संस्था सुरू करू नये असेही या कोडनुसार अपेक्षित आहे. तर मोठ्या संख्येने जमणाऱ्या धार्मिक प्रार्थना, जमाव यासारख्या गोष्टींना सर्व झोनमध्ये मज्जाव करण्यात आला आहे. जेष्ठ नागरिक, गरोदर महिला यांना घराबाहेर पडण्यासाठी मज्जाव करण्यात आला आहे.

हे एकदाच सुरू झालं

कन्टेंटमेंट झोन वगळता सर्वच ठिकाणी दारू विक्रीसाठी परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे राज्यातील तळीरामांना आता मोठा दिलासा मिळाला आहे. त्यामुळे मुंबई, पुणे, ठाणे सारख्या रेड झोनमध्ये आता वाईन्स शॉप्स खुले केले जाणार आहेत. मात्र, कटेंनमेंट झोनमध्ये अत्यावश्यक सेवेशिवाय इतर दुकांनाना परवानगी देण्यात आलेली नाही. एकाच रांगेत पाच अत्यावश्यक सेवेशिवाय असणाऱ्या दुकानांना ही परवानगी देण्यात आली आहे. या दुकानांसाठी सोशल डिस्टन्सिंगचा निकष मात्र कायम ठेवण्यात आला आहे. त्याशिवाय सलून, स्पा यासाठी ग्रीन आणि ऑरेंज झोनमध्ये परवानगी देण्यात आली आहे. आंतरजिल्हा प्रवासासाठी बसची सुविधा फक्त ग्रीन झोनमध्ये सुरू करण्यात आली आहे. कंटेन्टमेंट झोन वगळता मेडिकल, ओपीडीसाठी परवानगी देण्यात आली आहे. तसेच टॅक्सी, कॅब सेवेसाठी ग्रीन आणि ऑरेंज झोनमध्ये परवानगी देण्यात आली आहे. पण टॅक्सीत ड्रायव्हर आणि दोन व्यक्तींसाठीच ही परवानगी देण्यात आली आहे.

दुचाकी व चारचाकी वाहनांना ऑरेंज, ग्रीनझोनमध्ये नो इंट्री

दुचाकी आणि चार चाकी वाहनांसाठी ऑरेंज, ग्रीन झोनमध्ये परवानगी मिळाली आहे. पण दुचाकीवर एकच व्यक्ती तर चार चाकी वाहनात ड्रायव्हर आणि दोन व्यक्तींचाच समावेश असेल. शहरी भागातील दुकांनांनाही परवानगी देण्यात आली आहे. पण ही दुकाने कंटेन्टमेंट झोनमध्ये बंदच राहतील. त्याशिवाय ई कॉमर्स सेवा कंटेन्टमेंट झोन वगळता सर्व ठिकाणी सुरू राहतील. सरकारी, खाजगी कार्यालये ही रेड झोनमध्ये ३३ टक्के उपस्थितीने सुरू राहतील. पण महापालिका क्षेत्रात एमएमआर, पीएमआर आणि मालेगाव याठिकाणी मात्र खाजगी कार्यालये सुरू करण्यासाठी मज्जाव करण्यात आला आहे. तर सरकारी कार्यालये मात्र ५ टक्के उपस्थितीत सुरू राहतील.

First Published on: May 3, 2020 6:00 PM
Exit mobile version