शहापुरात १० वर्षात ४ कोटी ९१ लाख पाण्यात

शहापुरात १० वर्षात ४ कोटी ९१ लाख पाण्यात

मुंबई महानगरातील लाखो रहिवाशांना पाणी पुरवठा करणार्‍या भातसा, तानसा, वैतरणा, मध्य वैतरणा या चारही धरणांशेजारी वसलेल्या दुर्गम आदिवासी गाव पाड्यात दरवर्षी उन्हाळ्यात भीषण पाणी टंचाई दरवर्षी असते. या गावपाड्यांना टँकरने पाणी पुरवण्यासाठी राज्य सरकारच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाला मागील 10 वर्षांत तब्बल 4 कोटी 91 लाख 85 हजार रुपये एवढा खर्च करावा लागला आहे.

वर्ष – टँकर्सची संख्या- खर्च रुपयांमध्ये
२००९ -१५- 24 लाख 96 हजार
2010 -14 -23 लाख 78 हजार
2011 -7 -5 लाख 2 हजार
2012 -11 -32 लाख 1 हजार,
2013 -14 -50 लाख 73 हजार
2014 -16-65 लाख 60 हजार
2015-16 -55 लाख 16 हजार
2016 -18 -82 लाख 59 हजार
2017-16 -55 लाख
2018 -23-97 लाख

10 वर्षांत एकूण 4 कोटी 91 लाख 85 हजार रुपये

भावली पाणी योजना म्हणजे दिवास्वप्न
पाणी टंचाई काळात टँकरसाठी 3 कोटी 94 लाख 85 हजार रुपये एवढा खर्च झाल्याचे उपअभियंता आडे यांनी
मान्य केले आहे. परंतु शहापूर तालुक्यातील असलेल्या बहुतांश पाणी योजना अपूर्ण अवस्थेत आहेत. पाण्यासाठी दुसरा कोणताच सोर्स नसल्याने पाणी टंचाईचा प्रश्न गंभीर आहे. शहापुरात भावली पाणी योजनेसाठी प्रयत्न सुरू आहेत मात्र स्थानिक इगतपुरी ग्रामस्थांचा विरोध आणि प्रशासकीय मान्यता न मिळाल्याने ही भावली योजना रखडली आहे. ही पाणीपुरवठा योजना 210 कोटी रुपयांची असून ही योजना भविष्यात अस्तित्वात आल्यास या योजनेद्वारे 96 गावे व 250 पाड्यांना पाणी पुरवठा केला जाईल, असे उपअभियंता आडे यांनी दैनिक ‘आपलं महानगर’ला सांगितले.

शहापूर तालुक्यात एकूण 203 पाणी योजना असल्याची माहिती मिळते आहे यातील 157 पाणी योजना सुरु आहेत तर 40 पाणी योजना अपूर्ण अवस्थेत आहेत यातील बहुतांश पाणी योजनांत भ्रष्टाचार झाल्याने त्यांची चौकशी सुरू आहे.

First Published on: April 26, 2019 4:25 AM
Exit mobile version