गोकुळ दूध संघाच्या सभेत गोंधळ, शौमिका महाडिकांनी घेतली समांतर सभा

गोकुळ दूध संघाच्या सभेत गोंधळ, शौमिका महाडिकांनी घेतली समांतर सभा

कोल्हापूर – गोकुळची 60 वी सर्वसाधारण वार्षिक सभा गोंधळात पारपडली. गोकुळच्या सभेत सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये संघर्ष झाला. बसण्यासाठी जागा नसल्याने आणि समाधानकारक उत्तर दिले जात नसल्याने शौमिका महाडिक सभेतून बाहेर पडल्या. त्यांनी समातंर सभा सुरू केली. यावेळी त्यांनी दूध उत्पादकांची फसवणूक करु नका, असे आवाहन करत सत्ताधाऱ्यांनी दिलेली वाचने पाळली नाहीत असा आरोप केला. सभा संपल्यानंतर सतेज पाटील, हसन मुश्रीफ, ऋतुराज पाटील यांना सभासदांनी खांद्यावरून व्यासपीठावर नेले.

विरोधकांना उत्तरे देणे कठीण – शौमिका महाडिक

आमच्यासारख्या सर्वसामान्य विरोधकांनी अधिकारी भाषा कळत नाही. संचालकांना साध्या सोप्या शब्दात उत्तरे द्यावी इतकीच मागणी होती. राजकीय प्रश्न विचारलेले नसतानाही त्यांना उत्तर देणे कठीण पडत आहे. आमच्या डोळ्यात डोळे घालणेही त्यांना जड जात आहे. अहवाल वाचत असताना, प्रश्नांची उत्तरे देत असताना नजरही उचलली जात नाही. दूध उत्पादक खूप साधा असून, त्याला गुंडाळण्याचा प्रयत्न करु नका. उत्तरे देता येत नाही हे चेअरमन साहेबांनी मान्य करावे, आशी टीका  शैमिका महाडिक यांनी केली.

गोकुळचे अध्यक्ष विश्वास पाटलांच्या भाषणात व्यत्यय –

गोकुळचे अध्यक्ष विश्वास पाटील यांचे भाषण सुरू असताना विरोधकांकडून व्यत्यय आणण्यात आला. विरोधकांनी घोषणाबाजी सुरू केल्यावर सत्तारूढ गटाकडून प्रत्युत्तर देण्यात आले. यामुळे अध्यक्ष पाटील यांचे भाषण सुरू असताना घोषणा-प्रतिघोषणा सभास्थळी गोंधळ उडाला.

गोकुळचे नेते सभासदांसमवेत बसल्याने चर्चा –

गोकुळचे नेते आमदार सतेज पाटील, आमदार हसन मुश्रीफ, आमदार ऋतुराज पाटील हे सभासदांसमवेत बसले होते. गोकुळचे नेते सभामंच सोडून खाली बसण्याचा हा पहिलाच प्रसंग असल्याची चर्चा यावेळी रंगली होती. यावेळी समाधानकारक उत्तरे दिली जात नसल्याचा आरोप करत विरोधकांनी सभास्थळ सोडले. यानंतर शैमिका मडाडिक यांनी समांतर सभा सुरू केली

First Published on: August 29, 2022 3:40 PM
Exit mobile version