समृद्धी महामार्गाचे उद्घाटन लांबणीवर, उन्नत मार्गाच्या सुपर स्ट्रक्चरला इजा पोहचल्याने सोहळा पुढे ढकलला

समृद्धी महामार्गाचे उद्घाटन लांबणीवर, उन्नत मार्गाच्या सुपर स्ट्रक्चरला इजा पोहचल्याने सोहळा पुढे ढकलला

नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गावर काही ठिकाणी उन्नत मार्गाचे सुपर स्ट्रक्चर हे आर्च पद्धतीचे असून त्याला इजा पोहचली आहे. याशिवाय वन्यजीव उन्नत मार्गाचे कामही अपूर्ण असल्याने समृद्धी महामार्गाचा उद्घाटन सोहळा पुढे ढकलण्यात आला आहे.

राज्य सरकारने २ मी रोजी समृद्धी महामार्गाच्या २१० किलोमीटर लांबीच्या पहिल्या टप्प्याचे लोकार्पण करण्याचे निश्चित केले होते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते समृद्धीचे उद्घाटन होणार होते, मात्र आता नवीन पद्धतीच्या सुपर स्ट्रक्चरच्या कामामुळे उद्घाटन लांबणीवर पडणार आहे.

आर्च पद्धतीचे काम ३० एप्रिलपर्यंत पूर्ण होणे अपेक्षित होते. हे काम अंतिम टप्प्यात असताना त्यातील १०५ पैकी काही आर्च स्ट्रीप्सना अपघातात हानी पोहचली आहे. तज्ज्ञांसोबत पाहणी आणि चर्चा करून नवीन पद्धतीचे सुपर स्ट्रक्चर बनवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यासाठी दीड महिन्याचा कालावधी आवश्यक आहे. तसेच वन्यजीव उन्नत मार्ग पूर्ण झाल्याशिवाय महामार्ग वाहतुकीसाठी खुला करता येणार नाही.

नागपूर-मुंबई ह्या ७१० किलोमीटर लांबीच्या हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाची उभारणी एमएसआरडीकडून सुरू आहे. त्यातीलच नागपूर ते सेलूबाजार या पहिल्या टप्प्याचे लोकार्पण करण्यात येणार होते. त्यासाठी सार्वजनिक बांधकाममंत्री एकनाथ शिंदे यांनी शुक्रवारी पहिल्या टप्प्याची पाहणी करून २ मे रोजी लोकार्पणाची घोषणा केली होती.

First Published on: April 26, 2022 4:55 AM
Exit mobile version