वैद्यकीय कोरोनायोद्धांच्या मानधनात वाढ

वैद्यकीय कोरोनायोद्धांच्या मानधनात वाढ

नाशिक महापालिकेतील रुग्णालयांमध्ये कार्यरत असणार्‍या कोरोनायोद्धांच्या मानधनात वाढ करण्याचा महत्वाचा निर्णय महापालिकेचे आयुक्त कैलास जाधव यांनी घेतला आहे. वाढीव मानधन २६ फेब्रुवारी २०२१ पासून देण्यात येणार आहे.

राज्यशासनाने कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी १३ मार्च २०२० पासून साथरोग प्रतिबंधात्मक कायदा लागू केला असून, खंड २ ते ४ मधील तरतुदीनुसार अधिसूचना निर्गमित केली आहे. या सुचनेनुसार महापालिका क्षेत्रासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यासाठी महापालिका आयुक्तांना सक्षम प्राधिकारी म्हणून प्राधिकृत करण्यात आले आहे. सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत भिषक, आया, वॉर्डबॉय, मल्टीस्क्रील हेल्थ वर्कर यांची कोरोनाकाळात महिन्यांसाठी तात्पुरत्या स्वरुपात मानधनावर नियुक्ती करण्यात आली आहे. या पदांसाठी अदा करण्यात येणारे मानधन कमी अलयाने पदावरील नियुक्त कर्मचारी काम करण्यास इच्छुक नाहीत किंवा कामावर रुजू होण्यास नकार देतात. जे कर्मचारी काम करत आहेत त्यांना मिळणारे मानधन तुटपुंजे आहे. त्यांच्या मानधनात वाढ करण्यासाठी वरिष्ठ अधिकार्‍यांकडे, विभागीय नोडल अधिकारी, वैद्यकीय अधीक्षक व वैद्यकीय आरोग्य अधिकार्‍यांकडे मागणी केली आहे. त्यानुसार पदांचे वाढीव मानधन २६ फेब्रुवारी २०२१ पासून देण्यात येणार आहे. डॉक्टरांचे मासिक मानधन दीड लाख होते ते आता अडीच लाख झाले आहे. आया यांचे मासिक मानधन सहा हजाराहून १२ हजार, वॉर्डबॉयचे सहा हजाराहून १२ हजार तर मल्टीस्कील हेल्थ वर्करचे सात हजाराहून १२ हजार करण्यात आले आहे.

First Published on: April 9, 2021 9:59 PM
Exit mobile version