जुन्या पेन्शन योजनेसाठी १४मे पासून बेमुदत संप

जुन्या पेन्शन योजनेसाठी १४मे पासून बेमुदत संप

नाशिक : महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद कर्मचारी युनियनने (सर्व संवर्ग) जिल्हा परिषदेला २००५ नंतर सेवेत कार्यरत कर्मचार्‍यांना जुनी पेन्शन योजना लागू करणे तसेच सर्व कर्मचार्‍यांना वेतन त्रुटी मंजूर करणे या मागण्यांसाठी 14 मार्चपासून बेमुदत संपाचा इशारा दिला आहे. या संदर्भात युनियनने जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना निवेदन दिले आहे.

निवेदनात म्हटल्याप्रमाणे, महाराष्ट्र राज्य शासकीय निमशासकीय समन्वय समितीच्या सुकाणू समितीत राज्य जिल्हा परिषद कर्मचारी युनियन सहभागी असून सुकाणू समिती व राज्यस्तरीय युनियनने घेतलल्या निर्णयानुसार राज्यातील सन 2005 नंतर कार्यरत कर्मचार्‍यांना 1982 नुसार जुनी पेन्शन योजना लागू करणे व बक्षी समिती खंड दोन अहवालात वेतन त्रुटी बाबत दुर्लक्षित केलेल्या जिल्हा परिषद कर्मचार्‍यांवर झालेला अन्याय या दोन प्रमुख मागण्या व इतर प्रलंबित मागण्यांसाठी सर्व संवर्गीय कर्मचारी प्रामुख्याने लिपिक लेखा आरोग्य परिचर व वाहन चालक संघटना हे दिनांक 14 मार्चपासून राज्यस्तरीय संघाच्या आदेशानुसार बेमुदत संपाद्वारे आंदोलन सुरू करणार आहे.

युनियनच्या मागण्या मंजूर करण्यासंदर्भात शासनाने सहानुभूतीपूर्वक विचार करावा व निवेदन शासनास पाठवावे असे कळविण्यात आले आहे. निवेदनावर युनियनचे अध्यक्ष विजयकुमार हळदे कार्याध्यक्ष अजित आव्हाड सचिव प्रशांत कवडे सहसचिव ज्ञानेश्वर गायकवाड कोषाध्यक्ष श्रीरंग दीक्षित उपाध्यक्ष कल्पना कापडणीस यांच्या स्वाक्षर्‍या आहेत

First Published on: March 9, 2023 1:28 PM
Exit mobile version