भारतीय शास्त्रज्ञांनी शोधले करोनाचे ११ विषाणू

भारतीय शास्त्रज्ञांनी शोधले करोनाचे ११ विषाणू

भारतीय संशोधकांनी ३,६०० वेगवेगळ्या प्रकारच्या विषाणूंविषयी संशोधन केले. तेव्हा वुहानमधून संक्रमित झालेला करोनाचा मूळ स्वरूपातील विषाणू ए२ए या विषाणूने जगभरात थैमान घातल्याचे दिसून आले आहे, त्याचा भारतात ४५ टक्के संसर्ग झाला आहे, तर अन्य देशांमध्ये ८० टक्के संसर्ग झाला आहे. जगभरात करोनाच्या या मूळ विषाणूसह अन्य १० प्रकारचे करोनाचे विषाणू पसरले आहेत, परंतु करोनाचा मूळ विषाणू ए२ए या विषाणूमुळे मानवांच्या फुफ्फुसांना संसर्ग केला आहे. ज्यामुळे दोन लाखांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. हे संशोधन पश्चिम बंगालच्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ बायोमेडिकल जीनोमिक्सच्या शास्त्रज्ञांनी केले आहे.

इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चच्या (आयसीएमआर) इंडियन जर्नल ऑफ मेडिकल रिसर्चमध्ये प्रसिद्ध झालेल्या संशोधनानुसार, ए2ए या विषाणूने करोनाच्या उर्वरित १० प्रकारांवर वर्चस्व ठेवले आहे आणि हे विषाणू साथीच्या रोगाचा प्रसार करण्यास जबाबदार आहेत. ३,६०० विषाणूंवरील संशोधनानंतर संशोधकांनी अहवाल जाहीर केला आहे. डिसेंबर २०१९ ते ६ एप्रिल २०२० या काळात हे संशोधन करण्यात आले.

संशोधकांच्या म्हणण्यानुसार करोना विषाणू शरीरात जितक्या वेगाने पोहोचतो तितक्या लवकर शरीरात त्याची संख्या वाढते. ज्यामुळे रुग्णाची प्रकृती गंभीर बनते. ए२ए विषाणूमुळे सर्वात मोठा धोका निर्माण झाला आहे. या विषाणूमुळे अ‍ॅमिनो अ‍ॅसिड, एस्पार्टिक अ‍ॅसिडपासून ग्लाइसिनमध्ये रूपांतर होते. करोनाच्या इतर प्रकारांमध्ये केवळ एस्पार्टिक अ‍ॅसिड अस्तित्वात आहे आणि त्यात कोणताही बदल नाही. म्हणूनच ए२ए सर्वात प्राणघातक करोनाचा विषाणू आहे.

या संशोधनानुसार, काही देशांमध्ये ए२ए विषाणूचा प्रादुर्भाव ८० टक्क्यांपर्यंत असू शकतो. भारतात तो ४५ टक्के आहे. कोविड १९ पासून बचावासाठी जगभरात लस शोधण्याचा प्रयत्न होत आहे. परंतु सर्वात मोठी लढाई ही ए2ए विषाणूच्या विरोधातील आहे.

करोनाचे रूप जितके मजबूत तितकेच संक्रमण अधिक पसरते
संशोधकांनी करोनाचे आरएनए तपासला आहे. अहवालात असे दिसून आले आहे की मानवी फुफ्फुसे एसीई-२ प्रथिने त्यांच्या पृष्ठभागावरून सोडतात. करोनामधून तयार होणारे स्पाइक प्रथिने प्रथम एसीई-२ ला चिकटतात आणि नंतर दुसरा प्रथिने फुफ्फुसांच्या पेशींमध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न करतात. करोनाचे रूप जितके मजबूत असेल तितके ते मनुष्याच्या प्रथिनांमध्ये चिटकून फुफ्फुसांपर्यंत पोहचते.

First Published on: April 30, 2020 6:55 AM
Exit mobile version