आयटीआय विद्यार्थ्यांना २८ हजार रुपयांपर्यंत प्रशिक्षण शुल्क प्रतिपूर्ती, नवाब मलिक यांची घोषणा

आयटीआय विद्यार्थ्यांना २८ हजार रुपयांपर्यंत प्रशिक्षण शुल्क प्रतिपूर्ती, नवाब मलिक यांची घोषणा

शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधील (आयटीआय) पीपीपी योजनेच्या अंतर्गत उपलब्ध जागांवर प्रवेश घेणाऱ्या, तसेच खासगी आयटीआयमधून शिल्प कारागीर प्रशिक्षण योजनेच्या अंतर्गत अभ्यासक्रमांसाठी केंद्रीय ऑनलाईन पद्धतीने प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना २८ हजार ८०० रुपयांपर्यंत प्रशिक्षण शुल्क प्रतिपूर्तीचा लाभ देण्यात येत असल्याची माहिती कौशल्य विकास मंत्री नवाब मलिक यांनी दिली. तसेच चालू शैक्षणिक वर्ष २०२०-२१ मध्ये प्रथम आणि द्वितीय वर्षात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी यासाठी ऑनलाईन अर्ज करावेत, असे आवाहनही त्यांनी केले.

या योजनेतून लाभासाठी विद्यार्थ्यांना १० मार्चपासून ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरण्याची सुविधा www.mahadbtmahait.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात आल्याची माहितीही मलिक यांनी दिली आहे.

First Published on: March 15, 2021 6:48 PM
Exit mobile version