प्रसार माध्यमांसंदर्भात उदय सामंत म्हणाले…

प्रसार माध्यमांसंदर्भात उदय सामंत म्हणाले…

संग्रहित छायाचित्र

मुंबई | “काही ठिकाणी प्रसार माध्यमांनी प्रशासनाला सहकार्य करणे गरजेचे आहे”, अशी विनंती उद्योग मंत्री उदय सामंत (Uday Samant) यांनी माध्यमांना केली आहे. बारसू रिफायनरी (Barsu Refinery) येथे सर्वेक्षण सुरू आहे. या सर्वेक्षणाला विरोध करण्यासाठी स्थानिक महिलांनी झोपून आंदोलन केले आहे. आतापर्यंत पोलिसांनी विरोध करणाऱ्या २५ महिलांना ताब्यात घेतले आहे. यावेळी पोलिसांनी प्रसार माध्यमांना देखील हटविल्याचे व्हिडिओचा समोर आले होते. ‘माध्यमांनी प्रशासनाला सहकार्य करावे आणि झालेल्या प्रकाराबद्दल सामंतांनी दिल्लगिरी व्यक्त केली आहे.

प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींना पुन्हा बारसू येथे कव्हरेजसाठी परवानगी देणार का?, या प्रश्नावर उदय सामंत म्हणाले, “प्रसार माध्यमांना परवानगी दिलेली आहे. सर्व प्रसार माध्यमे येथे असल्याचा व्हिडिओ माझ्याकडे आले आहेत. मी जबाबदारीने सांगतो. काही ठिकाणी प्रसार माध्यमांनी देखील आम्हाला सहकार्य करणे गरजेचे आहे. कायदा आण सुव्यवस्था बिघणार नाही, यांची जशी आमची जबाबदारी आहे. तसेच चौथा स्तंभ म्हणून आपली देखली जबाबदारी आहे. आणि भविष्यात तुम्ही देखील आम्हाला सहकार्य करावे”, अशी विनंती सामंतांनी केली आहे.

“रिफायनरीला विरोध करणारे जसे लोक आहे. तसेच रिफायनरीला सर्मथक करणारे देखील लोक आहे. परंतु कोणी सर्मथकांवर बोलत नाही. ज्यावेळी प्रकल्प येतील त्यावेळी लोकांना रोजगार मिळणार आहे. प्रसार माध्यमांनी राज्य सरकारची चांगली भूमिका जनतेपर्यंत पोहोचवावी”, अशी विनंती उदय सामंतांनी केली आहे. उदय सामंत म्हणाले, “विरोधकांना बारसू येथील सर्वेक्षण थांबवायचे असेल तर सर्वांनी पत्रकार परिषद घेऊन तसे सांगावे. आणि आम्ही उद्योग प्रकल्प घालवित आहोत, असे कबूल करावे.”

एकनाथ शिंदे दीड वर्ष मुख्यमंत्री राहतील

मुख्यमंत्री नाराज आहे आणि ते गावाकडे निघून गेले आहेत, असा प्रश्न पत्रकारांनी उदय सामंतांना केल्यावर ते म्हणाले, “मुख्यमंत्र्यांच्या गावची जत्रा आहे. मुख्यमंत्री गावच्या जत्रेला गेले आहेत. आता गावच्या जत्रेला गेल्यानंतर मुख्यमंत्री नाराज असल्याचे म्हणत असेल तर, त्यांचा नागरी सत्कार त्यांच्या जत्रेत केला पाहिजे. सध्या राज्यात राष्ट्रवादी फुटण्याच्या चर्चा, अशा अनेक गोष्टींवर चर्चा सुरू आहे. त्या सत्यात उतरतील तेव्हा त्याचा विचार करू. परंतु, हेच मुख्यमंत्री दीड वर्ष राहतील, आणि मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वात पुढच्या वर्षी विधानसभेची निवडणूक होईल,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

 

First Published on: April 25, 2023 3:49 PM
Exit mobile version