LockDwon: तरुण अभियंत्यांची कमाल; सरकारी कार्यालयांसाठी बनवले E-modules!

LockDwon: तरुण अभियंत्यांची कमाल; सरकारी कार्यालयांसाठी बनवले E-modules!

LockDwon: तरुण अभियंत्यांची कमाल; सरकारी कार्यालयांसाठी बनवले E modules!

लॉकडाऊनमुळे अनेक कंपन्या, व्यवसाय बंद पडले. विविध क्षेत्रातील कामगार, कर्मचारी बेरोजगार झाले. अनेकांचे पगार कमी झाले. आयटी क्षेत्रालाही याचा फटका बसला असून लॉकडाऊनमुळे येत्या काळात विविध क्षेत्रात आणखी मोठ्या प्रमाणात उलथापालथ होण्याची शक्यता आहे. ही बाब लक्षात घेऊन पुणे येथील प्रॉबिटी सॉफ्टवेअर या आयटी कंपनीतील तरूण इंजिनिअरनी ही मोड्युलस तयार केली आहेत अर्थविषयक, मनुष्यबळ व्यवस्थापन, महसूल वाढ यासह एकूण पाच प्रकारची ही मोड्युलस असून विविध सरकारी आणि खासगी कार्यालयांसाठी ती उपयुक्त असल्याचा दावा करण्यात आला आहे.

विविध क्षेत्राप्रमाणेच आयटी क्षेत्रालाही लॉकडाऊनचा फटका बसला. मात्र संकट हीच संधी मानून पुण्यातील आयटीतील काही तरूण इंजिनिअरनी लॉकडाऊन नंतरची गरज ओळखत काही ई मोड्युलस बनवली आहेत. पुणे येथील प्रॉबिटी सॉफ्टवेअर या आयटी कंपनीतील तरूण इंजिनिअरनी ही मोड्युलस तयार केली आहेत. ही कंपनी सरकारी यंत्रणांसोबत १४ वर्ष काम करत असून मुंबई, ठाणे, पुणे, पिंपरी चिंचवड महानगरपालिका आणि सिडकोत काम करत आहे.

या पाच ई मोड्युलसमध्ये अर्थ, लेखा, मनुष्यबळ विकास, महसूल, करवसुली यांचा समावेश आहे. लॉकडाऊननंतर सध्या असलेले कर्मचारी आस्थापनांमध्ये असतील किंवा नसतील त्या संख्येला नजरेसमोर ठेवून मनुष्यबळ विकास विभागाची रचना, वेतन प्रणाली, खरेदी, विक्री व्यवहार, महसूल वाढ आणि करवसुलीचे उद्दीष्टय कसे अपेक्षित आहे, याचा वेध घेण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे, अशी माहिती कंपनीचे संचालक जितेंद्र जोशी यांनी दिली.

मुंबईसारख्या शहरातील महापालिकेला आधीच मंदीचा फटका बसला आहे. जकात हा उत्पन्नाचा महत्त्वाचा स्रोत गेल्यानंतर जीएसटी आला आहे. त्याचा परतावा केंद्राकडून होत असला तरी त्याइतकेच महत्त्वाचा स्रोत असलेल्या मालमत्ता कर वसुलीचे प्रमाण घटले आहे. या करासह विविध प्रकारच्या करांची वसुली आणि महसूल वाढ तसेच विविध प्रकारचे व्यवस्थापन यासाठी ही मोड्युलस उपयुक्त आहेत, असे जोशी यांनी स्पष्ट केले आहे.


ऑक्सिजन आर्मीच्या यशस्वी प्रयोगाने वाचवले १२५ रुग्णांचे जीव

First Published on: June 11, 2020 11:17 PM
Exit mobile version