KEMमध्ये इंटर्नशिप करणाऱ्या डॉक्टरांचे आंदोलन, सरकारकडे केली ‘ही’ मागणी

KEMमध्ये इंटर्नशिप करणाऱ्या डॉक्टरांचे आंदोलन, सरकारकडे केली ‘ही’ मागणी

KEMमध्ये इंटर्नशिप करणाऱ्या डॉक्टरांचे आंदोलन, सरकारकडे केली 'ही' मागणी

कोरोना काळाच्या सुरुवातीपासून रुग्णांच्या देखरेखीसाठी डॉक्टर्स स्वतःच्या जीवाची पर्वा न करता अहोरात्र काम करत आहेत. मात्र याचं डॉक्टर्सना आपल्या मागण्या पूर्ण करण्यासाठी रस्त्यावर उतरावे लागत आहे. यादरम्यान डॉक्टर्स कमी पडत असल्यामुळे इंटर्नशिप करणारे डॉक्टर देखील आपली भूमिका बजावताना दिसत आहे. परंतु आज इंटर्नशिप करणाऱ्या डॉक्टरांना देखील इतर डॉक्टर्सप्रमाणे आंदोलन छेडावे लागले आहे. इंटर्नशिप करणाऱ्या डॉक्टरांना विमा कवच द्यावा, अशी मागणी करत आज मुंबईतील केईएम रुग्णालयाबाहेर इंटर्नशिप करणाऱ्या डॉक्टरांनी आंदोलन केलं. पैसे अभावी काही दिवसांपूर्वी इंटर्नशिप करणाऱ्या डॉक्टर राहुल पवार यांचा म्युकरमायकोसिसमुळे मृत्यू झाला. त्यामुळे इंटर्नशिप करणाऱ्या डॉक्टरांनी आज हाताला काळी रीबिन बांधून प्रशासनाचा निषेध केला.

लातूर येथील खासगी मेडिकल कॉलेजमध्ये डॉ. राहुल पवार कोरोनाबाधितांवर उपचार करत होते. पण यादरम्यान त्यांना कोरोनाची बाधा झाली आणि त्यानंतर त्यांना म्युकरमायसोसिसचा संसर्ग झाला. औरंगाबादमधील एमजीएम रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. त्याच्या उपचारासाठी वर्गणी काढायची वेळ आली होती. मात्र त्यांच्या जवळ पैसे असते तर त्याच्यावर वेळत उपचार होऊन त्याचा जीव वाचला असता, असं म्हणत इंटर्नशिप करणाऱ्या डॉक्टरांनी सरकारचा निषेध केला आहे. प्रशासनाने आतातरी जाग व्हावं आणि इंटर्नशिप करणाऱ्या डॉक्टरांना विमा संरक्षण द्यावा, अशी मागणी या डॉक्टरांनी केली आहे. दरम्यान माहितीनुसार, महाराष्ट्रात आतापर्यंत ३ हजारांहून अधिक जणांचा म्युकरमायकोसिस आजार झाला आहे.

राज्यात रविवारी १८ हजार ६०० नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले तर ४०२ जणांच्या मृत्यूची नोंद झाली. तर २२ हजार ५३२ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. त्यामुळे आता राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या ५७ लाख ३१ हजार ८१५वर पोहोचली आहे. यापैकी आतापर्यंत ९४ हजार ८४४ जणांचा मृत्यू झाला असून ५३ लाख ६२ हजार ३७० जणांचा मृत्यू झाला आहे.


हेही वाचा – मेट्रोचा खेळखंडोबा ! मेट्रो प्रकल्पांना झालेल्या उशिरासाठी आकुर्ली मेट्रो स्थानक परिसरात भाजपचे आंदोलन


First Published on: May 31, 2021 2:00 PM
Exit mobile version