IPL Betting : बनावट अ‍ॅपद्वारे गडचिरोलीत आयपीएलवर सट्टेबाजी, चौघांना अटक

IPL Betting : बनावट अ‍ॅपद्वारे गडचिरोलीत आयपीएलवर सट्टेबाजी, चौघांना अटक

बनावट अ‍ॅपद्वारे गडचिरोलीत आयपीएलवर सट्टेबाजी, चौघांना अटक

गडचिरोली : देशात लोकसभा निवडणुकीप्रमाणेच आयपीएलची रणधुमाळी सुरू आहे. महिन्याभरापासून सुरू असलेल्या आयपीएलच्या सामन्यांवर दररोज जोरदार सट्टा लावण्यात आला आहे. गडचिरोलीतही एका ठिकाणी आयपीएलच्या सामन्यांवर सट्टा लावण्यात येत होता. याबाबतची माहिती गडचिरोली पोलिसांना मिळतात त्यांनी विशेष मोहीम राबवून सट्टा लावणाऱ्यांवर कारवाई केली आहे. पोलिसांनी अहेरी येथील बालाजी गेस्ट हाऊस येथे छापा मारून चौघांना अटक केल्याची माहिती समोर आली आहे. (IPL Betting four arrested by Gadchiroli Police)

मिळालेल्या माहितीनुसार, अहेरी पोलीस स्टेशनच्या हद्दीत आयपीएल सट्टा खेळवणाऱ्या बुकींबाबतची माहिती गडचिरोली पोलिसांना मिळाला होती. त्यानंतर पोलिसांनी याबाबतची विशेष मोहीम राबवत अहेरी परिसरात असलेल्या बालाजी गेस्ट हाऊस येथे छापा टाकला. यावेळी पोलिसांना बनावट नाईसी 7777 फन अशा बनावट प्लॅटफॉर्मवर ऑनलाइन आयपीएल क्रिकेटवर सट्ट्याचा खेळ खेळून लोकांना त्यावर पैसे लावण्यास भाग पडून, नशीब आजमवण्यास भाग पाडले जात असल्याचे निदर्शनास आले. ज्यामुळे पोलिसांनी या ठिकाणावरून निखील दुर्गे आणि आसिफ शेख या दोघांना सुरुवातील ताब्यात घेतले.

हेही वाचा… CSK vs SRH 2024 : धोनीमुळे चेन्नईच्या चाहत्याने प्रेयसीशी केला ब्रेकअप, पोस्टर व्हायरल

गडचिरोली पोलिसांनी कारवाई करत ताब्यात घेतलेल्या निखील दुर्गे आणि आसिफ शेख या दोघांकडून चार मोबाईल फोन आणि नऊ हजार 420 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. त्याशिवाय या कारवाईत पोलिसांनी या दोन्ही सट्टेबाजांना विश्वासात घेत त्यांची चौकशी केली. यावेळी पोलिसांना या दोन्ही सट्टेबाजांकडून आणखी महत्त्वाची माहिती प्राप्त झाली. ज्यामध्ये इरफान ईकबाल शेख (रा. अहेरी) आणि संदिप गुडपवार (रा. आल्लापल्ली) हे दोघे हा ऑनलाइन सट्टेबाजीचा रॅकेट चालवत असल्याचे समोर आले. तर, निखील दुर्गे, आसिफ शेख हे दोघे आयपीएल क्रिकेट बेकायदेशीरपणे ऑनलाइन सट्ट्याचा जुगार चालवणाऱ्यांमध्ये एजंट म्हणून काम करत असल्याचे समोर आले आहे.

ऑनलाइन सट्टा चालवणाऱ्यांची ही साखळी मोठी असून यामध्ये अन्य काही सट्टेबाजांचाही समावेश असल्याचे समोर आले आहे. यामध्ये निखील गुंडावार, प्रणित श्रीरामवार, अक्षय गनमुकलवार, फरमान शेख, फरदिन पठाण हे देखील सट्टयांमध्ये एजंटचे काम करत असल्याचे पोलिसांना सांगण्यात आले आहे. त्यामुळे या सर्व सट्टेबाजांविरोधात अहेरी पोलीस ठाण्यात महाराष्ट्र जुगार बंदी कायदा कलम 4 व 5 कायदयान्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. अहेरी पोलिसांनी सट्टेबाजांची ही मोठी साखळी उद्ध्वस्त केल्याने आता जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी अशा प्रकारच्या अवैध सट्टेबाजी पासून दूर राहावे, असे आवाहन केले आहे.

हेही वाचा… Dadar News : दादरमध्ये 1 लाख 80 हजार रुपयांची रोकड जप्त; निवडणूक भरारी पथकाची कारवाई


Edited By : Poonam Khadtale

First Published on: April 29, 2024 7:27 PM
Exit mobile version