करोना व्हायरस : भारतीय रेल्वेमध्ये आयसोलेशन कोच, भारतीय रेल्वेचा मोठा निर्णय

करोना व्हायरस : भारतीय रेल्वेमध्ये आयसोलेशन कोच, भारतीय रेल्वेचा मोठा निर्णय

कोरोना कालावधीत १७ वर्षीय मुलीचा उत्तरप्रदेश ते ठाणे रेल्वे प्रवास; रेखाचे बॉलिवूडचे स्वप्न स्वप्नच

करोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात पसरला तर परिस्थिती हाताबाहेर जाऊ शकते. तसेच दिवसेंदिवस करोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत चालली आहे. त्यामुळे भारतीय रेल्वेने रेल्वेचे कोच हे आयसोलेशन कोच म्हणून तयार करण्याचा निर्णय घेतला आहे. याचे एक परिपत्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठविण्यात आले आहे. यावेळी अँसेट होम्सचे व्यवस्थापकीय संचालक सुनील कुमार म्हणाले की, भारतीय रेल्वे गाड्यांची संख्या १२ हजार ६१७ असून प्रत्येकी गाड्यांमध्ये २४ ते ३० कोच असतात. याशिवाय आम्ही रेल्वेला रुग्णालयात रूपांतरित करू शकतो. यामध्ये कौंऊसलेशन रूम, मेडिकल स्टोर्स, प्रत्येकी ट्रेनमध्ये १ हजार बेडची क्षमता, आयसीयु आणि पॅन्ट्री या सुविधा असणार आहेत. तसेच शौचालयाची देखील सुविधा असणार आहे. कमीत कमी दिवसात १ कोटी बेड्स तयार करू शकतो, असेही सुनील कुमार म्हणाले.

याशिवाय देशात एकूण ७ हजार ५०० छोटी व मोठी रेल्वे स्थानके आहेत. आणि एक कोटी किलोमीटरचे रेल्वेचे नेटवर्क पसरले आहे. रुग्णालयात रूपांतरित गाड्या करोनाबाधित क्षेत्रात जाऊन त्यांना सेवा पुरवू शकतात. १४ एप्रिलपर्यंत रेल्वे सेवा बंद ठेवण्यात आल्यामुळे सर्व गाड्या सहज उपलब्ध होऊ शकतात. तसेच अनेक लहान मोठ्या रेल्वे स्थानकाद्वारे सेवा पुरवली जाऊ शकते. प्रत्येक रेल्वे स्थानकावर एकाच वेळी दोन गाड्या पार्क करता येतील आणि किमान १ हजार बेड असलेल्या २ हजार लोकांना वैद्यकीय सेवा दिली जाईल. देश सेवेच्या दृष्टिकोनातून कोणताही परतावा न घेता अँसेट होम्स या उपक्रमात सहभागी झाल्याबद्दल आनंदित आहोत, असेही कुमार बोलले.

देशातील १३३ कोटी लोकसंख्येपैकी १० टक्के लोक करोना विषाणूमुळे बाधित झाले आहेत. यासाठी १० कोटी बेड आवश्यक आहेत. २०११ च्या जनगणनेनुसार आणि डब्ल्यूएचओच्या अंदाजानुसार १ हजार लोकांमध्ये फक्त ०.७ बेड उपलब्ध आहेत. देशाने आता बेडची संख्या वाढविण्याचे लक्ष्य ठेवले आहे.

First Published on: March 26, 2020 11:24 AM
Exit mobile version