कोरोना मृतांच्या कुटुंबियांना ४ लाख मदत ही अफवाच

कोरोना मृतांच्या कुटुंबियांना ४ लाख मदत ही अफवाच

कोरोनामुळे मृत झालेल्या रुग्णाच्या नातेवाईकांना केंद्राकडून ४ लाख मदतनिधी देण्यात येत असल्याचे संदेश सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. त्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयात मदत मिळविण्यासाठी नागरिक गर्दी करू लागले आहेत. मात्र, ही माहिती खोटी असून अफवांवर विश्वास ठेऊ नका, असे आवाहन जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी केले आहे.

कोविडमुळे अनेकांनी आपल्या परिवारातील सदस्य गमावले. या काळात ज्या बालकांनी आपले आई-वडील गमावले, त्यांना शासनाकडून मदत देण्यात येत आहे. परंतु, गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर एक मेसेज व्हायरल होत आहे. यात राज्य आपत्ती निवारण निधीच्या माध्यमातून कोविडमुळे मृत्यू झालेल्या रुग्णांच्या नातेवाईकांना ४ लाख रुपयांची आर्थिक मदत केली जात असल्याचे म्हटले आहे. परंतु, या मेसेजमागील सत्यता तपासल्यानंतर ही अफवा असून असा कोणताही निर्णय प्रशासनाला प्राप्त झाला नसल्याचे जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केलयं. तसेच अफवांवर विश्वास ठेऊ नका, असेदेखील म्हटले आहे.

काय आहे संदेश?

केंद्राच्या आपत्ती व्यवस्थापनकडून कोरोनाने मृत्यू पावलेल्या व्यक्तीच्या कुटुंबाला रुपये 4 लाख नुकसान भरपाई मिळणार आहे. सोबतच एक फॉर्म देण्यात आला आहे. यात कोविडमुळे मृत्यू झालेल्या रुग्णांच्या नातेवाईकांची माहिती भरण्यास सांगण्यात आले आहे.

First Published on: August 13, 2021 7:10 AM
Exit mobile version