Jalgaon Burning Truck: जळगाव महामार्गावर धान्याच्या भरधाव ट्रकला भीषण आग

Jalgaon Burning Truck: जळगाव महामार्गावर धान्याच्या भरधाव ट्रकला भीषण आग

Jalgaon Burning Truck grain carring truck fire at jalgaon highway

जळगाव महामार्गावर एका धावत्या ट्रकला भीषण आग लागल्याची घटना रविवारी घडली. धान्यांनी भरलेल्या ट्रकने महामार्गावर अचानक पेट घेतला. मानराज पार्क जवळ असलेल्या रेल्वे पुलावर ही भीषण घटना घडली. भररस्त्यात ट्रकने पेट घेतल्याने सर्वत्र एकच आरडाओरडा झाला. ट्रकच्या आगीमुळे महामार्गावरील वाहतूक बराच वेळ थांबवण्यात आली होती. त्यामुळे महामार्गावर दूरपर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. ट्रकमध्ये धान्याची पोती असल्याने आग आणखी वाढली. घटना घडताच अग्निशमन दलाचे जवान तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. ट्रकला लागलेली आग विझवण्याच्या शर्थीच्या प्रयत्नांमुळे आग नियंत्रणात आणण्यात यश आले. जळगाव महामार्गावर रविवारी दुपारी देखील एका कारने भररस्त्यात पेट घेतला होता. त्यानंतर काही वेळातच धावत्या ट्रकला आग लागल्याची घटना घडली.

गेल्या काही दिवसांपासून जळगाव महामार्गावर बर्निंग कारची मालिका सुरुच आहे. तीन दिवसांपूर्वी जळगाव भुसावळ दरम्यान एका कारने पेट घेतला. या घटनेचा व्हिडिओ देखील व्हायरल झाला होता. या आगीत संपूर्ण कार जळून खाक झाली होती. कार चालकाला कारचे तापमान वाढले असल्याचे लक्षात आले आणि त्याने लगचेच कार रस्त्याच्या कडेला लावून कारमधून उतरुन दूर दिशेला उभा राहिला आणि काही क्षणातच भररस्त्यात कारने पेट घेतला. कार चालकाने दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही.

त्याचप्रमाणे जळगाव राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ वर बांभोरी येथे कापूर नेणाऱ्या ट्रकचा टायर अचानक फुटल्याने ट्रक पेट घेतला. संपूर्ण ट्रक जळून भस्मसात झाला. ट्रकमध्ये असलेल्या कापसामुळे आगीने जलद पेट घेतला. गेल्या अनेक दिवसांपासून जळगाव महामार्गावर सुरू असलेल्या बर्निंग कार आणि ट्रकच्या मालिकांमुळे पोलीस तसेच अग्निशमनदल देखील सतर्क झाले आहेत.


हेही वाचा – नगर-मनमाड हायवेचे काम १५ दिवसांत सुरू होणार

First Published on: November 1, 2021 8:28 AM
Exit mobile version