ED Enquiry : पाहुणे आणि सत्ताधारूढ पक्ष हे एकाच पक्षातील ? यंत्रणांचे काम संशयास्पद – जयंत पाटील

ED  Enquiry : पाहुणे आणि सत्ताधारूढ पक्ष हे एकाच पक्षातील ? यंत्रणांचे काम संशयास्पद – जयंत पाटील

देशात तपास यंत्रणांचा सत्तारूढ पक्षांकडून होणाऱ्या वापरावर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी जोरदार हल्ला चढवला. नवाब मलिक आणि अनिक देशमुख यांची उदाहरणे देत तपास यंत्रणांच्या कारभारावर त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. सत्ताधारी आणि तपास यंत्रणा एकाच राजकीय पक्षातील असल्यासारखे काम करत असल्याचेही ते म्हणाले. विरोधकांना सन्मानाने वागणूक देण्याची महाराष्ट्राची राजकीय परंपरा असल्याची आठवणही त्यांनी करून दिली. शरद पवार यांच्या ८१ व्या वाढदिवसाच्या निमित्ताने नेहरू सेंटर येथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

नवाब मलिक हे दररोज सकाळी पाहुण्यांच्या स्वागतासाठी सज्ज असतात अशी बातमी वाचायले मिळाली. हे पाहुण कोण ? तर या देशामध्ये सरकारच्या विरोधात कोणी बोलले तर हे पाहुणे आपल्या घरी येतात. तुम्ही सतत बोलायला लागलात तर हे पाहुणे आपल्या घरी येऊ शकतात. तुम्ही जर काहीच बोलला नाहीत, तर पाहुणे दुर्लक्ष करतात. तुम्ही जर त्यांच्यात जाऊन बसलात तर पाहुणे तुमचच स्वागत करायला येऊ शकतात. या देशातील सत्तारूढ पक्ष आणि हे पाहुणे एकाच पक्षातील आहेत की काय ? अशी शंका वाटावी अशा पद्धतीने यंत्रणा काम करताहेत.

अनिल देशमुखांच्या बातम्या आपण एकतो. अनिल देशमुखांच्या घरावर सीबीआयच्या कितीवेळा धाडी व्हाव्यात? सातवेळा धाडी झाल्याचेही त्यांनी सांगितले. सीबीआयने सातवेळा अनिल देशमुखांच्या घरी धाडी घातल्या. सगळ्या पद्धतीने तुम्ही मानत नसाल तर तुमच्या घरी सीबीआयची धाड घातली जाते ही यंत्रणेची काम करण्याची नवी पद्धत आता साऱ्यांनाच माहिती झाली आहे. पारावर बसलेल्या सर्वसामान्य माणसालाही ही पद्धत आता माहिती झाली आहे.

शरद पवार साहेबांना विधानसभा निवडणूकांआधी ईडीची नोटीस आली. त्यामुळेच ईडी म्हणजे काय ? ही गोष्ट महाराष्ट्रातील प्रत्येकाला आता माहिती झाली आहे. त्यामुळे कुणालाही काहीही याचे आश्चर्य वाटत नाही. महाराष्ट्रात नवाब मलिकांनी कणखरपणाने यंत्रणांविरोधात बोलायला सुरूवात केली. ज्या पद्धतीने यंत्रणा काम करत आहेत त्याचा समाचार त्यांनी घेतला.

महाराष्ट्रात कधीच सूडबुद्धीने राजकारण झाले नाही. महाराष्ट्रात विरोधकालाही सन्मानाने वागवण्याची पद्धत आहे. भुजबळ साहेब कितीतरी महिने तुरूंगवास झाला. विरोधकांनाही सन्माने वागवण्याची शिकवण ही महाराष्ट्रात अलिकडे होताना दिसत नाही. त्यामुळेच टोकाची भूमिका, समोरच्याला त्रास होण्याची भूमिका दिसून येत आहे. एखाद्या विधायक कामात संघर्षाची भूमिका होऊ शकते, टोकाची भूमिका घेतली जाऊ शकते. पण त्याचे रूपांतर हे वैयक्तिक आयुष्यात होणे, कुटूंबाला तपास यंत्रणांना सामोरे जावे लागणे ही महाराष्ट्रात कधी यंत्रणा नव्हती. पण यंत्रणेच्या वापरातून ही नवीन पद्धत रूढ दुर्दैवाने रूढ झाली. माध्यमांनाही अशा पद्धतीचा अनुभव आला आहे.


Happy Birthday Sharad Pawar : शरद पवारांचा ८१ वा वाढदिवस, पंतप्रधानांपासून ते दिग्गज नेत्यांनी दिल्या शुभेच्छा

First Published on: December 12, 2021 12:47 PM
Exit mobile version