कामासाठी कुणावर नाराजी धरायची नसते, मंत्रिमंडळ चर्चा बाहेर न सांगण्याची प्रथा आहे – जयंत पाटील

कामासाठी कुणावर नाराजी धरायची नसते, मंत्रिमंडळ चर्चा बाहेर न सांगण्याची प्रथा आहे – जयंत पाटील

राजकीय जीवनात काम करताना कुणावरही नाराजी धरायची नसते. तसेच मंत्रिमंडळातील चर्चा ही बाहेर सांगण्याची प्रथा असते त्यामुळे मंत्रिमंडळातील चर्चा बाहेर सांगण्याची आवश्यकता वाटत नसल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी म्हटले आहे. काही दिवसांपूर्वी जयंत पाटील यांनी मुख्य सचिव सिताराम कुंटे यांच्या कामकाजावर नाराजी दर्शवली होती. कॅबिनेट बैठकीत जयंत पाटील यांनी मुख्य सचिव कुंटे यांना प्रश्नांची सरबत्ती करत मंत्रिमंडळाचे निर्णय बदलण्याचे अधिकार आपणाला कुणी अधिकार दिलेत? असा प्रश्न जयंत पाटील यांनी केला होता.

जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी पत्रकार परिषदेत मुख्य सीताराम कुंटे यांच्यावर कामकाजावर नाराजी व्यक्त केल्यावरुन प्रश्न विचारण्यात आला होता. यावर जयंत पाटील यांनी उत्तर दिले आहे की, कामकाज करत असताना कोणावर राजी नाराजी धरायची नसते. त्या- त्या वेळी तो-तो विषय असतो. एका विषयाची नाराजी दुसऱ्या विषयावर धरायची नसते. त्यामुळे कोणावर राजी नाराजी हा प्रश्न उद्भवत नाही. एखाद्या बाबत जर ती गोष्ट नाही पटली तर दुसरी गोष्ट काय संबंध येण्याची आवश्यकता नाही. त्यामुळे कोणावर नाराजी असण्याची काही आवश्यकता नाही आणि गरजही नाही. जी गोष्ट घडते ती त्या वेळी बोललेली बरी असते असे जयंत पाटील यांनी म्हटले आहे.

मंत्रिमंडळातील चर्चा बाहेर न सांगण्याची प्रथा

मंत्री मंडळात काय चर्चा झाली असा प्रश्न केला असता, मंत्रिमंडळातल्या चर्चा या सरकारच्या अंतर्गत बाब असते. आपण क्षपतेचा भाग बघितला तर मंत्रिमंडळातली झालेली चर्चा असते ती बाहेर बोलायची नसते. तसेच मंत्रिमंडाळतली चर्चा बाहेर बोलायची नाही अशी प्रथा आहे. त्याबाबत काही बोलायचे झाल्यास मुख्यमंत्र्यांशी आवश्यकता असेल तर बोलेल असे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी म्हटले आहे.

उत्तर प्रदेशमध्ये नदीत मृतदेह आढळल्याची घटना धक्कादायक

उत्तर प्रदेशमध्ये कोरोनाचे प्रमाण अधिक वाढलेले असावे. नदीमध्ये मोठ्या प्रमाणात मृतदेह आढळत आहेत याचा अर्थ तेथील कोरोना परिस्थिती फार वाढली आहे आणि ही घटना धक्कादायक आहे. ज्या नदीत मृतदेह आढळले त्या नदीच्या पाण्यावर पुढे करोडो लोक अवलंबून आहेत. आपल्या भारतात अशी घटना कधी झाली असेल ऐकीवात नाही. त्यामुळे आपल्या देशात एवढ्या मोठ्या लोकसंख्या असलेल्या राज्यात कोरोनावर नियंत्रण मिळवण्यात अपयश आले आहे. तेथील सरकारचे हे अपयश आहे सरकारला काही कमतरता असतील किंवा स्मशान भूमित जागा नसेल म्हणून थेट नदीत मृतदेह सोडण्यास सुरुवात केली आहे हे अत्यंत क्लेशदायी असल्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी म्हटले आहे.

First Published on: May 13, 2021 5:15 PM
Exit mobile version