सत्तेत येण्याची गरज नाही, फक्त आरक्षणाचा मार्ग सांगा; जयंत पाटलांचा फडणवीसांना टोला

सत्तेत येण्याची गरज नाही, फक्त आरक्षणाचा मार्ग सांगा; जयंत पाटलांचा फडणवीसांना टोला

सत्तेत येण्याची गरज नाही, फक्त आरक्षणाचा मार्ग सांगा; जयंत पाटलांचा फडणवीसांना टोला

माझ्या हाती सत्तेची सूत्रे आली तर चार महिन्यांत ओबीसींना राजकीय आरक्षण देईन, अशी गर्जना करणाऱ्या विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी जोरदार टोला हाणला आहे. फडणवीस यांनी सत्तेत येण्याची गरज नाही, फक्त आरक्षणाचा मार्ग सांगा, आम्ही तो प्रश्न सोडवतो, अशा शब्दांत जयंत पाटील यांनी फडणवीस यांना टोला लगावला आहे. राष्ट्रवादीने परिवार संवाद यात्रा काढली असून या निमित्त जयंत पाटील नांदेड येथे बोलत होते.

सत्तेत आल्यावर मी आरक्षणाचा प्रश्न सोडविणार, असं देवेंद्र फडणवीस म्हणतात. म्हणजे सत्तेत आल्याशिवाय मी काहीच करणार नाही. सत्ता नसेल तर महाराष्ट्रासाठी काहीच देणार नाही, हा तर फडणवीसांचा दुटप्पीपणा आहे, अशी टीका जयंत पाटील यांनी फडणवीस यांच्यावर केली. पुढे बोलताना त्यांनी फडणवीस यांनी सत्तेत येण्याची गरज नाही. आम्ही सरकार चालवण्यास सक्षम आहोत, त्यांनी फक्त मार्ग सांगावा, असा टोला देखील जयंत पाटील यांनी लगावला. यावेळी त्यांनी भाजपला आणि फडणवीस यांना एवढाच कळवळा असता तर अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांना एवढे वर्षे तुरुंगात खितपत ठेवलं नसतं. त्यांचे त्या काळात अतोनात हाल करण्यात आले. एकनाथ खडसे यांच्या सारखअया नेत्याला त्रास देऊन पक्ष सोडायला मजबूर केलं. त्यामुळे आता ओबीसी समाजासाठी आंदोलन करणं हे हास्यास्पद असल्याची खरमरीट टीका जयंत पाटील यांनी केली.

काय म्हणाले होते फडणवीस?

भाजपने मुंबई, पुणे, सातारा, कोल्हापूर, नागपूर, नाशिक अशा महत्त्वांच्या शहरांत तसंच तालुक्यांच्या ठिकाणी ओबीसी आरक्षणासाठी जेल भरो आंदोलन केलं. नागपूरमधल्या आंदोलनात फडणवीसांना ठाकरे सरकारवर हल्ला चढवला. खास करुन त्यांनी काँग्रेसला लक्ष्य केलं. ओबीसी आरक्षणाचा मारेकरी काँग्रेसच आहे, असा गंभीर आरोपही त्यांनी यावेळी केला. सरकारच्या नाकर्तेपणामुळे आरक्षण गेलं आहे. पण माझ्या हातात पुन्हा सूत्र दिली तर ओबीसींना पुन्हा आरक्षण मिळवून देईन, नाहीतर राजकारणातून संन्यास घेईन, असं फडणवीस म्हणाले होते.

 

First Published on: June 27, 2021 2:54 PM
Exit mobile version