जितेंद्र आव्हाड यांच्याकडे आता नवी जबाबदारी

जितेंद्र आव्हाड यांच्याकडे आता नवी जबाबदारी

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या मर्जीतले आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील डॅशिंग नेते राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्याकडे आता आणखी एक नवीन जबाबदारी देण्यात आली आहे.  राज्य सरकारने सोलापूर जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्यावर सोपवली असून,  कामगार मंत्री दिलीप वळसे-पाटील यांच्याकडील सोलापूर जिल्ह्याच्या पालक मंत्री पदाचा पदभार काढून घेतला आहे. यासंदर्भात शासन आदेशही तातडीने जारी करण्यात आला आहे.

म्हणून जितेंद्र आव्हाड यांच्याकडे दिली जबाबदारी 

महाविकास आघाडी सरकार अस्तित्वात आल्यानंतर सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री पद हे कामगार मंत्री दिलीप वळसे –पाटील यांच्याकडे देण्यात आले होते. मात्र सोलापूरचे पालकमंत्री पद सोपविल्यानंतर जिल्ह्याच्या विकासासाठी फारसे लक्ष देता येत नव्हते. त्यातच कोरोना आजारामुळे राज्यातील असंघटीत कामगार, बांधकाम कामगारांच्या प्रश्नाकडे सातत्याने लक्ष देणे गरजेचे बनल्याने त्यांच्याकडील सोलापूरचे पालकमंत्री पद काढण्यात आल्याची माहिती मिळत आहे. तर जितेंद्र आव्हाड यांच्याकडे सध्या गृहनिर्माण खाते असून, ते सध्या चांगलेच सक्रिय आहेत यामुळे त्याच्याकडे ही नवीन जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

….अन आव्हाड म्हणाले माझा संपूर्ण वर्षाचा पगार घ्या

राज्यात सध्या करोनाचे संकट असून, भविष्यात याचा फटका राज्याच्या अर्थ व्यवस्थेवर देखील पडण्याची शक्यता आज. त्यामुळेच या करोनाच्या संकटात प्रत्येक जण मदतीसाठी पुढे येत आहे. त्यातच आता राज्याचे गृह निर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी आपल्या मनाचा मोठेपणा दाखवत आपला या वर्षीचा सर्वच पगार राज्याच्या तिजोरीत जमा करावा असे सांगितले आहे. माझा फक्त महिन्याचा नको, तर या वर्षीचा संपूर्ण पगार राज्याच्या तिजोरीत जमा करावा, अशी घोषणा गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केली.

काय म्हणालेत नेमकं आव्हाड 

कोरोनामुळे राज्यातील सार्वजनिक आरोग्य व आर्थिक परिस्थिती धोक्यात आली आहे. यावेळी राज्यशासन लोकप्रतिनिधींच्या वेतनात कपात करणार आहे. यावर आपल्याला एकाही महिन्याचे वेतन न देता या वर्षीचा संपूर्ण पगार राज्याच्या तिजोरीत जमा करावा असे  गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी सांगितले. एवढेच नाही तर आपल्याला स्वीय सहाय्यकाला आणि द्रायव्हरला देणारे वेतन देखील जमा करावे असे आव्हाड म्हणाले. दरम्यान राष्ट्रवादीच्या खासदार-आमदारांनी एक महिन्याचा पगार राज्य सरकारला देण्याचा निर्णय याआधीच घेतला आहे.
First Published on: March 31, 2020 7:10 PM
Exit mobile version