प्रा. जोगेंद्र कवाडे यांची शिंदे गटासोबत युती

प्रा. जोगेंद्र कवाडे यांची शिंदे गटासोबत युती

अखेर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील बाळासाहेबांची शिवसेना आणि प्रा. जोगेंद्र कवाडे यांच्या नेतृत्वाखालील पिपल्स रिपब्लिकन पार्टीची युती झाली आहे. जोगेंद्र कवाडे यांनी पत्रक काढत या युतीची घोषणा केली. त्यामुळे बाळासाहेबांची शिवसेना आणि भाजपच्या महायुतीत पीआरपीचाही समावेश झाला आहे. (Jogendra kawade alliance with eknath shinde camp Maharashtra politics)

प्रा. जोगेंद्र कवाडे यांच्या पत्रात काय लिहिलंय?

प्रा. जोगेंद्र कवाडे यांनी एक पत्रक काढलं आहे. त्यात त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील बाळासाहेबांच्या शिवसेनेसोबत आमची युती होत आहे. याची अधिकृत घोषणा थोड्याच वेळात पत्रकार परिषदेत करण्यात येणार असल्याचे जोगेंद्र कवाडे यांनी सांगितले.

प्रा. जोगेंद्र कवाडे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एकत्रित पत्रकार परिषद घेत या युतीची घोषणा केली. त्यावेळी “ठाकरेंनी आमच्या निवेदनाची दखल घेतली नाही. सर्व सामान्यात मिसळणारा मुख्यमंत्री राज्याला लाभला. धाडसी मुख्यमंत्री महाराष्ट्रला लाभला. महाराष्ट्रला नवीन दिशा देण्यात काम करु”, असे प्रा. जोगेंद्र कवाडे यांनी म्हटले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय म्हणाले?

“आम्ही लोकांना न्याच देण्याची भूमिका घेतली. आमचा संघर्ष साधासुधा नव्हता. चळवळीत आक्रमकपणे न्याय मिळवून दिला. दोन्ही पक्ष संघर्षातून पुढे आले आहेत. कवाडेंसोबत आधीपासूनच जिव्हळ्यांचे संबध आहेत. लाठ्या-काठ्या खाऊन इथपर्यंत पोहचलो आहे. लोकांना न्याय देणारे दोन्ही पक्ष एकत्र आले. कवाडे यांचे आंदोलन देशव्यापी होतं. आमची बाळासाहेबांच्या विचारांची भूमिका आहे”, असे मुख्यमंत्री शिंदे यांनी म्हटले.


हेही वाचा – निवासी डॉक्टरांचा संप मागे पण वीज कर्मचारीही संपावर; रुग्णालयातील रुग्णांच्या हालात भर

First Published on: January 4, 2023 4:25 PM
Exit mobile version