K CSR आणि प्रशांत किशोर यांच्यातील बैठकीने राजकीय चर्चांना उधाण

K CSR आणि प्रशांत किशोर यांच्यातील बैठकीने राजकीय चर्चांना उधाण

राजकारणातील चाणक्य अशी ओळख असणारे राजकीय रणनितीकार प्रशांत किशोर आणि तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांच्या सोमवारी एक बैठक झाली. मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या या बैठकीमुळे चर्चांना उधाण आले आहे. या बैठकीचे अनेक राजकीय अर्थ लावले जात आहेत. आगामी वर्षात होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकांमुळे या बैठकीकडे सगळ्यांचेच लक्ष लागले आहे. त्यामुळे एक वेगळेच राजकीय महत्व या बैठकीला आले आहे. टीआरएसचे सुप्रीमो के चंद्रशेखर राव या भाजपविरोधी मोर्चेबांधणी करत आहेत. विरोधी पक्षांच्या आघाडीत पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी तसेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा समावेश आहे.

प्रशांत किशोर यांच्याकडे तामिळनाडूतील डीएमके आणि पश्चिम बंगालच्या टीएमसीच्या निमित्ताने विधानसभा निवडणुकीसाठीची जबाबदारी देण्यात आली होती. देशातील अनेक राज्यांमध्ये प्रशांत किशोर यांच्याकडे निवडणुकीच्या यशस्वी अभियानाची मोहिमेसाठी नेमले होते. आज अखेर तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांची प्रशांत किशोर यांनी भेट घेतली. ही भेट गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत होती. याआधीही प्रशांत किशोर हे टीआरएसच्या संपर्कात राहिलेले आहेत. पण तेलंगणा राष्ट्र समिती (टीआरएस) यांच्यात कोणताही करार अद्याप झालेला नाही. तसेच या विषयामध्ये अद्यापही चर्चा सुरू आहे.

प्रशांत किशोर आणि राव यांच्यातील बैठकीचे कोणतेही अधिकृत वृत्त समोर आलेले नाही. राव आणि प्रशांत किशोर हे भाजपाशी संबंधित नसलेल्या राजकीय पक्षांना एकत्र आणण्याच्या प्रयत्नात आहेत. विधानसभा निवडणुका तसेच राजकीय घटनाक्रमांवर चर्चा करण्याच्या निमित्ताने ही भेट झाली असल्याची माहिती आहे. तेलंगणात आगामी वर्षी डिसेंबर महिन्यात विधानसभा निवडणूक होणार असल्याची माहिीत आहे. टीआरएससाठी किशोर हे काम करतील यानिमित्ताने गेल्या काही दिवसांपासून चर्चांना उधाण आले आहे.


 

First Published on: February 28, 2022 9:33 PM
Exit mobile version